उरण तालुक्यात कोरोनाचा विस्फोट – करंजा गावात २१ जणांना समूह संसर्ग, संख्या आणखी वाढण्याची शक्यता

उरण: उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील सुरकीचापाडा येथे एकाच दिवसात तब्बल २१ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्याने उरण तालुका हादरून गेला आहे. एका कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कात आल्यामुळे

 उरण: उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील सुरकीचापाडा येथे एकाच दिवसात तब्बल २१ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्याने उरण तालुका हादरून गेला आहे. एका कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कात आल्यामुळे हा समुह संसर्ग झाला आहे. हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. चार कुटुंबातील २१ लोकांची कोरोना चाचणी शनिवारी पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे उरण तालुक्यात आता कोरोना रूग्णांची संख्या २९ झाली आहे.

करंजा सुरकीचा पाडा येथील एका ४३ वर्षीय व्यक्तीला कोरोना झाला असल्याचा अहवाल शुक्रवार ८ मे रोजी आला होता. त्यानंतर या व्यक्तीची कोरोना इतिहास तपासला असता त्याच्या आई आणि वडिलांचे आठ दिवसांच्या अंतराने निधन झाले होते. या मृत आई वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा संशय आहे.त्यांच्या निधनाला गावातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. तसेच कोरोनाबाधित मुलाच्या संपर्कात कुटूंबातील अनेक सदस्य आणि ग्रामस्थ आले आहेत.या कोरोनाबाधित व्यक्तीच्या जास्तवेळ संपर्कात आलेल्या २१ व्यक्तींची ९ मेला चाचणी घेण्यात आली होती त्यातील सर्व व्यक्ती कोरोना पॉझिटीव्हअसल्याचे निष्पन्न झाले आहे. कोरोनाची लक्षणे दिसूनही या कुटूंबाने कोरोना टेस्ट न केल्यामुळे हा कोरोनाचा स्फोट झाला असल्याचेग्रामस्थांचे म्हणणे आहे.

करंजा हे गाव अत्यंत दाटीवाटीने वसलेले आहे. या गावात मच्छिमारांची संख्या मोठी आहे. मच्छी खरेदी करण्यासाठी तालुक्यातील विविध ठिकाणांहूननागरीकांची येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे ही साखळी वाढण्याची शक्यता आहे. लागण झालेल्यांमध्ये एक ते चार वर्षाची तीन बालके आणि ९ महिला आहेत. तर ९ पुरूष आहेत. एका कुटूंबातील ११ व्यक्ती या बाधित असल्याचे समोर आले आहे. दरम्यान कोरोनाबाधीत कुटूंबाच्या सांत्वनासाठी आलेल्या शेकडो नागरीकांशी त्यांचा संपर्क आला आहे. दरम्यान सुरकीचा पाडा हा संपूर्णपणे सील करण्यात आला असून हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषितकरण्यात आला आहे. दरम्यान या कुटूंबाच्या संपर्कात आलेल्या आणखी काही लोकांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे तर अनेकांचे चाचणीचे रिपोर्टयेणे बाकी असल्याने येथील कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.