उरणमध्ये पोलिसाच्या मुलीला कोरोनाची लागण, कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली ७ वर

उरण: उरण कोरोनामुक्त होण्याच्या वाटेवर असतानाच एका पोलिसाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याची पत्नी व ११ वर्षीय मोठी मुलगी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली आहे. तिच्यावर दवाखान्यात उपचार सुरू

उरण: उरण कोरोनामुक्त होण्याच्या वाटेवर असतानाच एका पोलिसाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याची पत्नी व ११ वर्षीय मोठी मुलगी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली आहे. तिच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. त्यामुळे उरणमध्ये आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७  असून त्यातील पोलिसाच्या घरातील तिघांचा समावेश आहे.

 देशात व राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला असतानाच उरणमध्ये ४ जण कोरोना रुग्ण आढळले होते. त्यातील ३ जण कोरोनामुक्त होऊन उरलेला १ जणही कोरोनामुक्त होणार होता. मात्र पोलीस खात्यातील मुबंई यलोगेट येथे ड्युटीवर असलेल्या परंतु उरण मोरा येथे वास्तव्यास असलेला पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर पत्नी व आज त्याची ११ वर्षीय मुलगी ही कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे.

उरण कोरोनामुक्त होण्याच्या वाटेवर असतानाच सामान्य जनतेच्या सुरक्षिततेची काळजी घेत आपले कर्तव्य निभावणाऱ्या पोलिसाला  व त्याच्या पत्नीला व मुलीला कोरोना झाला आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने उरणच्या जनतेत भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच उरण शहरात हे तिसरा रुग्ण असल्याने शहरवासीयांत भितीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळाचा परिसर आधीच सील करण्यात आला आहे. उरण शहरात पोलीस व त्याची पत्नी व मुलगी कोरोनाबाधित आहे. त्यामुळे उरण तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या ७ वर गेली आहे. यामुळे आणखीन रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.