उसर्ली गावाजवळील हातभट्टी पोलिसांनी केली उद्ध्वस्त, तिघांना घेतले ताब्यात

पनवेल: पनवेल तालुक्यातील उसर्ली गावाजवळ बेकायदेशीर गावठी दारूच्या हातभट्टीवर पनवेल शहर पोलिसांनी धाड टाकली. तसेच ही हातभट्टी उद्ध्वस्त करून भट्टी लावणार्‍या तिघांना ताब्यात घेतले आहे. उसर्ली

पनवेल: पनवेल तालुक्यातील उसर्ली गावाजवळ बेकायदेशीर गावठी दारूच्या हातभट्टीवर पनवेल शहर पोलिसांनी धाड टाकली. तसेच ही हातभट्टी उद्ध्वस्त करून भट्टी लावणार्‍या तिघांना ताब्यात घेतले आहे. उसर्ली गावाजवळ बेकायदेशीररित्या गावठी हाभट्टी दारू गाळण्याचे काम सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वासराव बाबर, पो.ना. किरण सोनवणे व पो.ना. नंदकुमार माने यांच्या पथकाने आज उसर्ली गावाजवळ पनवेल-पेण रेल्वे मार्गावर रेल्वे ट्रॅकच्या कडेला बेकायदेशीररित्या गावठी हाभट्टी दारू गाळताना छापा टाकून ती उध्वस्त केली. यावेळी  २८ हजार १५० रूपये किमतीचे दारू बनविण्याचे एकूण ८१० लिटर एकूण कच्चे रसायन, प्लॅस्टिक ड्रम, पत्र्याचे डबे, गावठी दारू, दोन स्टेव्ह व इतर भांडी असा ऐवज ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणी भरत म्हात्रे, भगवान जमादार व डान्सर छोटू राठोड या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.  वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या २५ दिवसांमध्ये पनवेल परिसरात ६ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून २३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून १, ५५, ९४९  रूपयांचे विदेशी मद्य व गावठी हातभट्टी दारू तसेच ३ वाहने जप्त करण्यात आली आहेत.