नवी मुंबई विशेष गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदाचा विनोद चव्हाण यांनी स्वीकारला पदभार

पनवेल: नवी मुंबई विशेष गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदाचा पदभार विनोद चव्हाण यांनी २४ एप्रिल रोजी विशेष शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त गोवेकर यांच्याकडून स्वीकारला. पनवेल पोलीस ठाण्यात वरिष्ठ

पनवेल: नवी मुंबई विशेष गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदाचा पदभार विनोद चव्हाण यांनी २४ एप्रिल रोजी विशेष शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त गोवेकर यांच्याकडून स्वीकारला. पनवेल पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी कार्यरत असताना विनोद चव्हाण यांना बढती मिळून रेल्वे विभागात नियुक्ती झाली होती. नवी मुंबई विशेष गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त गोवेकर यांची बदली पुण्यात झाल्याने त्यांच्या जागेवर विनोद चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. शुक्रवारी त्यांनी आपला पदभार स्वीकारला . विनोद चव्हाण यांनी यापूर्वी रायगड जिल्ह्यात श्रीवर्धनला पोलिस उपनिरीक्षक ,माणगावला पोलीस निरीक्षक आणि नवी मुंबई आयुक्तालयात पनवेल  शहर येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम केले आहे. मुंबईला रेल्वे विभागात बढतीनंतर काही महिने काम केल्यावर राज्य शासनाने  त्यांची बदली पुन्हा नवी मुंबईत आयुक्तालयात केली. विनोद चव्हाण २०२० मध्येच या पदावरून निवृत्त होतील. पोलीस उपनिरीक्षक ते सहाय्यक पोलीस आयुक्त असा त्यांच्या कार्याची चढता आलेख कौतुकास्पद राहिला आहे.