पाली खोपोली राज्य महामार्गावरील समस्या सोडवा, कन्स्ट्रक्शन कंपनी बदला – वंचित बहुजन आघाडीची मागणी

पाली : वाकण-पाली-खोपोली राज्यमार्ग क्र. ५४८ (अ) या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील समस्या सोडवून या मार्गाचे रुंदीकरण करत असलेली बीसीसी कन्स्ट्रक्शन कंपनी बदलावी अशी मागणी

पाली : वाकण-पाली-खोपोली राज्यमार्ग क्र. ५४८ (अ) या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील समस्या सोडवून या मार्गाचे रुंदीकरण करत असलेली बीसीसी कन्स्ट्रक्शन कंपनी बदलावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी मार्फत करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन आज वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना दिले.
 
 वाकण-पाली-खोपोली हा राज्यमार्ग क्र. ५४८ (अ) असून हा मार्ग एकूण ३९ किलोमीटर लांबीचा आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून या राज्य महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सन २०१६ पासून हाती घेण्यात आले. ते अतिशय संथ गतीने सुरू आहे. ढिसाळ व संथ कामामुळे याआधी काम करणाऱ्या मोनिका कंन्ट्रक्शनकडून    काम बेग कन्स्ट्रक्शनकडे (बीसीसी) सोपविण्यात आले आहे. मात्र आताही काम संथ गतीने होत आहे. आज घडीला रस्त्याचे बरेचसे काम अपूर्ण व अर्धवट आहे. अनेक वेळा खड्डे आणि खराब रस्त्यामुळे अपघात होत आहेत. त्यामुळे ही कन्स्ट्रक्शन कंपनी देखील बदलण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे सुधागड तालुका अध्यक्ष अमित गायकवाड यांनी केली आहे. यावेळी निवेदन देताना अमित गायकवाड, आनंद जाधव, स्वप्नील गायकवाड, सतीश गायकवाड, समीर गायकवाड, वैभव जाधव व अनिल जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.