अरविंद बनसोडे आणि विराज जगताप यांच्या हत्या करणाऱ्यांवर कारवाई करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

शिळफाटा : वंचित बहुजन आघाडी*राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्यात घडलेल्या जातीय अत्याचाराच्या घटनांची चौकशी करावी. याबाबत माहिती मिळणेकरिता आणि या

शिळफाटा : वंचित बहुजन आघाडी*राष्ट्रीय अध्यक्ष  अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्यात घडलेल्या जातीय अत्याचाराच्या घटनांची चौकशी करावी.  याबाबत माहिती मिळणेकरिता आणि या घटनेतील आरोपींवर कडक कारवाई करण्याकरिता महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सविस्तर निवेदन खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांच्या मार्फत खोपोली शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सविस्तर  निवेदन देऊन सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध अरविंद बनसोडे आणि विराज जगताप यांच्या निर्घृण हत्येमधील सूत्रधार खुन्यांना पकडून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

हे निवेदन देताना खोपोली वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष दिपक गायकवाड, जिल्हा सदस्य संदीप गाडे, गणेश बनसोडे, कुणाल पवार, रोहित वाघमारे, सुमित जाधव, प्रफुल पवार, कुंदन मोरे, भगवान खंडागळे यांच्यसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.  सध्या सोशल मीडियावर अरविंद बनसोडे अणि विराज जगताप यांच्या हत्येनंतर मराठा समाज अणि बौध्द समाजातील तरुण अतिशय खालच्या थराला जाऊन महिलांविषयी अभद्र भाषेचा वापर करीत आहेत . समाजा समाजात तेढ निर्माण होत आहे . त्यासंबंधी वंचित बहुजन आघाडीचे खोपोली शहराध्यक्ष दिपक गायकवाड यांनी यावेळी सर्वाना आवाहन केले आहे  की, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहत आहोत जिथे पर स्त्री मातेसमान आहे. अशा महाराष्टात अशा प्रकारे स्त्रियांविषयी अभद्र भाषेचा वापर होत असल्याबद्दल खंत व्यक्त करून अशा अभद्र भाषेचा वापर करू नये आणि  कोणत्याही जातीवादी शक्तीला बळी पडून काही नुकसान होऊ नये अथवा काही अमानुष प्रकार घडता कामा नये. त्याचबरोबर या गुन्ह्यातील जे आरोपी आहेत त्यांना कायदयाने योग्य ती शिक्षा द्यावी आणि पोलीस प्रशासनाने यात कोणत्याही जातीवादाला खतपाणी न घालता प्रामाणिकपणे योग्य ती कारवाई करून अन्यायग्रस्तांना न्याय देण्यात यावा, अशी निवेदन पत्रदवारे  मागणी करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या झालेल्या अमानुष घटनेकडे लक्ष द्यावे, अशीही अपेक्षा व्यक्त केली आहे .