अलिबागमधील जिल्हा रुग्णालयातील २ आरोग्यसेवकांना कोरोनाची लागण

पनवेल : अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात काम करणाऱ्या दोन आरोग्यसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे. या दोघांवर जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत. यामुळे

पनवेल : अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात काम करणाऱ्या दोन आरोग्यसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे. या दोघांवर जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत. यामुळे रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना आयसोलेशन वॉर्डात उपचारासाठी ठेवण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत अलिबागमध्ये पन्नासच्यावर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आयसोलेशन कक्षात कोरोनाबाधितांशी थेट संपर्क आला असल्याने या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. या आरोग्य सेवकांवर अलिबाग येथील आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत. त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन त्यांचेही स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 

रायगड जिल्ह्यात कोविड योद्ध्यांना लागण व्हायला सुरुवात झाली आहे. अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील दोघा वॉर्डबॉयना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे. यामुळे रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून त्यांनी आज जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांची भेट घेऊन आपल्याला सुरक्षा विषयक साधने उपलब्ध व्हावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर अपुरा कर्मचारी वर्ग असूनही आम्ही कोरोनाची लढाई लढत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सांगितले. आतापर्यंत जिल्ह्यात आरोग्य सेवेतील ७ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. महाड व कर्जत येथील नर्स तसेच कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील २ डॉक्टर, माथेरान येथील एका डॉक्टरला यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. यातील महाड येथील महिला कर्मचारी कोरोनाचा मुकाबला करून सुखरूप घरी आली आहे.