मुंबई गोवा महामार्गाचे वाजले तीन तेरा- महामार्गाला आले तळ्याचे स्वरूप

पोलादपूर : मुंबई गोवा महामार्गाचे काम काम सुरू असताना लॉकडाऊनच्या काळात महामार्गचे काम काही काळ बंद होते. पोलादपूर जवळील नडगाव हद्दीत महामार्गाचे डोंगर खणून रस्त्याचे काम संथ गतीने सुरू होते व त्याला

पोलादपूर : मुंबई गोवा महामार्गाचे काम काम सुरू असताना लॉकडाऊनच्या काळात महामार्गचे काम काही काळ बंद होते. पोलादपूर जवळील नडगाव हद्दीत महामार्गाचे डोंगर खणून रस्त्याचे काम संथ गतीने सुरू होते व त्याला पर्यायी मार्ग म्हणून नदीतून रस्ता तयार करण्यात आला होता.  मात्र पाऊस झाला तर रस्ता वाहून जाण्याची भीती असताना देखील कोणतीही फिकीर न बाळगता महामार्गाचे काम सुरू होते.  आज झालेल्या जोरदार पावसामुळे पर्यायी रस्त्या वाहून गेला असून त्याला तळ्याचे स्वरूप आल्याने महामार्गाच्या कामाचा पुन्हा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या घटनेमुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झालेली होती. त्यानंतर नव्याने दोन दिवसांपूर्वीच केलेल्या पुलाचा वापर सुरू करून तेथून नाईलाजाने वाहतूक सुरू करण्यात आली असून त्याही रस्त्यावर चिखलाचा सडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन आपला प्रवास करावा लागत आहे