कोरोना महामारी पासून आदीवासी समाज का सुरक्षित?, शासनाने त्याना काय सुविधा पुरवल्या

आदीवासी समाजानी याआदी कुठल्या महामारी आणि आजाराला जुमानलेल नाही मुळात त्यांना कोरोना महामारी हा रोग सुद्धा समजला नसेल या महामारी नंतर शासनानी काय त्यांच्यासाठी सोयिसुविधा औषध उपचार दिलेत का ? उपटसोंड्या सारख दिवसभर शहरांत गर्दीच्या ठिकाणी त्यांचा नाहक वावर तरी आहे का ?

महाड : जगात कोरोना महामारी रोगाला आता सहा महिने पूर्ण झालेत यावर लस कधी येईल तेव्हा येईल परंतु १३५ करोड लोकसंख्येच्या भारत देशानी कोरोना संसंर्गातून बरच काही शिकवून दिल हे सत्य नाकारता येणार नाही. आज मुंबई लगत असणाऱ्या रायगड जिल्हयात कोरोनानी हाहाकार माजवला आहे त्याच सत्य आणि कारण शोधण्याची हिच खरी वेळ आहे.

दरम्यान महाड तालुका आता कोरोना हॉटस्पॉट बनू पहात आहे या कारणानी पुन्हा पंधरा दिवसांचा लॉक डाऊन येथे केल्यास नवल ते वाटण्याच कारणच नाही परंतु आज याच महाड तालुक्यांतील काबाड कष्ट करणाऱ्या आदीवासी समाजात कोरोना पॉझिटीव्ह किती रुग्ण आहेत त्याची आकडेवारीच जिल्हा आरोग्य प्रशासनानी जाहिर करावी आणि अस का ? त्याचा शोध बोध संशोधन प्रभोदन करण्या सारख असच म्हणाव लागेल.

कोरोना महामारी संसर्ग रोग एवढया लवकर संपणार नाही. गेल्या सहा महिन्यात महाड तालुक्यात ५० पर्यंत मृत्युचा आकडा पोहचत आहे तर १२०० पर्यंत रुग्ण आकडा झाला आहे. यामुळे कोरोना साखळी पुढील वर्षभर हटणार नाही अस म्हटल तर वावग ठरणार नाही वर म्हटले प्रमाणे कोरोना संसंर्ग कुठल्या जाती धर्मात प्रवेश करीत नाही मग कुठल्याही ठोस सोयीसुविधा नसणारा आदीवासी समाज या महामारी पासून चार हात लांब कसा काय ? हा खरोखर संशोधनाचा आणि जिल्हा आरोग्य विभागाला आव्हान देणारा असाच आहे.

सुरुवातीला कडकडीत लॉकडाऊन कराव लागल नंतर ते शिथील केल नंतर हॉटस्पॉट लॉकडाऊन पुन्हा ते अन लॉकडाऊन हे सर्व जनतेच्या जिवा आरोग्यासाठी सुरु आहे परंतु लोकांना त्याच काहीच सोयर सुतक नाही. आज शहरांत बँकात, कार्यालयात, दुकानांत सर्वत्र पहाता खरच कोरोना संसर्ग महारोग निघून गेला का? असा मनाला प्रश्न पडतो.

पोलिस, आरोग्य अधिकारी, सफाई कामगार, पत्रकार आदी या जिवघेण्या महामारी विरोधात इमानइतबार काम करत आपला आपल्या कुंटूंबाचा जिव धोक्यात टाकून काम करतायत त्यात नाहक सेवा बजावताना त्याना आपले प्राण गमवावे लागत आहेत. यामध्ये फक्त आदीवासी समाज कामापुरताच शहरांत बाजारात दिसत असून इतर वेळी तो आपल गाव वाडी खेड येथेच सुरक्षित जीवन जगत आहे हेच त्याच कोरोना पासून चार हात दूर रहाण्याच खर गुपीत आहे.

आमचा मुख्य व्यवसाय मासेमारी, भात शेतीची सर्व कामे रानभाज्या विटांचा व्यवसाय. आम्हाला कोरोना रोग माहित नाही. आमचा व्यवसाय आणि घर बाकी कायबी माहित नाही.

दामू विठ्ठल वाघे, करंजखोल आदीवासी वाडी महाड - रायगड

आदीवासी समाजानी याआदी कुठल्या महामारी आणि आजाराला जुमानलेल नाही मुळात त्यांना कोरोना महामारी हा रोग सुद्धा समजला नसेल या महामारी नंतर शासनानी काय त्यांच्यासाठी सोयिसुविधा औषध उपचार दिलेत का ? उपटसोंड्या सारख दिवसभर शहरांत गर्दीच्या ठिकाणी त्यांचा नाहक वावर तरी आहे का ? म्हणूनच हा आदीवासी समाज उगाच कोरोना फोरोना पासून दूर ते याच कारणा मुळे पंधरा दिवसा पूर्वी महाड शहरांतील काजळपूरा खारकांड मोहल्यातील पाच मजली तारिक गार्डन इमारत कोसळूण दुदैवी दुर्घटना घडली होती. तेव्हा तीन दिवस त्याठिकाणी हजारो बघ्यांची गर्दी जमली होती, तेव्हा कोरोना रजेवर गेला होता का ? यामुळे वर्षभर कोरोना सोबत रहावच लागणार आहे. आदिवासी समाजा कडून स्वतःला सुशिक्षित समजणाऱ्यांनी बोध घेणे गरजेचे आहे.

लॉक डाऊन मुळे आम्हाला कोरोना माहित झाला त्याची आमाला काय बी भिती वाटत नाही. आम्ही आमची मुल बाळ बाजारात जातो सामान घेवून घरीच रहातो त्यामुळे आम्ही आमच्या वाडीत सुरक्षित आहोत .

-तुकाराम बळीराम मुकणे, करंजखोल आदीवासी वाडी, महाड - रायगड