पोलादपूरकरांवर संकटांची मालिका सुरूच; रानडुकरच्या हल्ल्यात ३ जण जखमी

पोलादपूर: पोलादपूरकरांवर संकटाची मालिका सुरू झाली आहे. आधीच पावसाने झोडपले मग कोरोनाने घाबरविले तर गुरुवारी सकाळी रानात गेलेल्या तीन नागरिकांवर रानडुकरांनी हल्ला करत जखमी केल्याची घटना पोलादपूर

 पोलादपूर: पोलादपूरकरांवर संकटाची मालिका सुरू झाली आहे. आधीच पावसाने झोडपले मग कोरोनाने घाबरविले तर गुरुवारी सकाळी रानात गेलेल्या तीन नागरिकांवर रानडुकरांनी हल्ला करत जखमी केल्याची घटना पोलादपूर येथे घडली आहे. गुरुवारी पोलादपूर तालुक्यातील दिवील येथील भाऊ भिलारे , भारती भिलारे ,ओंकार  भिलारे  रानात सकाळी फाटी गोळा करण्यासाठी गेले असता पिसाळलेल्या डुकराने त्यांना उडविले. यामध्ये एकाची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

रक्तबंबाळ झालेले तिघेजण कदमवाडी रानातून येत असताना ग्रामस्थांना दिसून आले असता त्यांना प्रथम पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करत त्यांना पुढील उपचारासाठी  महाड येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले  मात्र यामध्ये एकाची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना  उपचारासाठी मुंबईला हलविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.  या हल्ल्यात भाऊ यांच्या पोटावर डोक्यावर हल्ल्याच्या खुणा दिसून येत आहेत. तसेच इतर जखमींची हातावर पायावर जखमा दिसून आले आहेत या हल्ल्यात भाऊ याच्या  दोन्ही हाताच्या नसा बाधित झाल्या आहेत. 

मार्च व एप्रिल महिन्यात झालेल्या पावसात शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचे अतोनात नुकसान झाले होते. तसेच काही दिवसांपूर्वी प्रभातनगर पश्चिम भागातील एका कुटुंबातील ६५ वर्षीय महिलेचा कोरोनाची बाधा झाल्याने मृत्य झालाने पोलादपूरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सर्वत्र बंद असल्याने अनेक ठिकाणी वन्यजीव प्राणी सर्रास मोकळे  फिरत आहेत. पोलादपूर तालुक्यातील डोंगराळ भागात मोठ्या प्रमानवर रानडुक्कर मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांची संख्या वाढत आहे. अशात काही रानडुक्कर आपली जागा सोडून मानवी वस्तीत आल्यानंतर आक्रमक होत असल्याने हल्ला झाल्याचे समोर आले आहे.