अत्यंत धोकादायक इमारतींविरोधात दोन दिवसात पुन्हा दवंडी पिटवणार – मुख्याधिकारी अर्चना दिवे

पेण शहरामध्ये आधीच वाढते अतिक्रमण आणि बांधकामाबाबत बेजबाबदारपणा हे गणित जुळलेले असतानाच शहरातील तरे आळी, दामगुडे आळी आणि बुद्धनगर या तीन ठिकाणी धोकादायक इमारती, तर कुंभार आळी, फणस डोंगरी, भगवान महावीर मार्ग, झिराळ आळी, रामवाडी,दामगुडे आळी, विठ्ठल आळी या सात ठिकाणी अत्यंत धोकादायक इमारती असल्याचे पालिकेने केलेल्या सर्व्हे नंतर उघड झाले आहे.

पेण : रायगड जिल्ह्यातील महाड येथील तारिक गार्डन ही इमारत सोमवारी सायंकाळी कोसळल्यानंतर(Building collapse in Rigad) आता प्रत्तेक शहरातील धोकादायक, मुदतबाह्य तसेच अत्यंत धोकादायक इमारतींची माहिती बाहेर येत असून आता प्रत्तेक तालुक्यातील स्थानिक प्रधासान हडबडून जागे झाले आहे.याबाबत पेण शहराचा आढावा घेतला असता पेण शहरामध्ये पालिकेने पावसाळ्यापूर्वी केलेल्या सर्व्हे नुसार शहरामध्ये तीन धोकादायक तर सात अत्यंत धोकादायक इमारती आढळल्या(Danger buildings)  असल्याची माहिती समोर आली आहे.

पेण शहरामध्ये आधीच वाढते अतिक्रमण आणि बांधकामाबाबत बेजबाबदारपणा हे गणित जुळलेले असतानाच शहरातील तरे आळी, दामगुडे आळी आणि बुद्धनगर या तीन ठिकाणी धोकादायक इमारती, तर कुंभार आळी, फणस डोंगरी, भगवान महावीर मार्ग, झिराळ आळी, रामवाडी,दामगुडे आळी, विठ्ठल आळी या सात ठिकाणी अत्यंत धोकादायक इमारती असल्याचे पालिकेने केलेल्या सर्व्हे नंतर उघड झाले आहे.

महत्वाचे म्हणजे पेण पालिकेने या इमारत धारकांना तशा प्रकारची नोटीस देऊनही इमारत धारकांनी आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारचा दुरुस्तीचा अथवा इमारत पुनर्बांधणीचा पालिकेमध्ये अर्ज केला नसल्याचे उघड झाले आहे. याबाबत पेण पालिकेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांना विचारले असता, महाड येथे झालेल्या इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा येत्या दोन दिवसात शहरातील इमारती आणि घरे यांचा सर्व्हे करण्यात येणार असून ज्या इमारतींना यापूर्वी नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यांना पुन्हा एकदा नोटीस पाठविण्यात येणार आहेत. मात्र तरीसुद्धा त्यांनी नोटीसीला योग्य ते उत्तर दिले नाही तर कायद्याने कारवाई करण्यात येईल.