वरंध घाटातून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ देणार नाही : भरतशेठ गोगावले

वरंध घाटांमधील माझेरी गावाच्या नजीक सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे घाटांमध्ये दगडी तसेच संरक्षक भिंत कोसळली असल्याने घाट रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीकरिता बंद केली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाकरिता पुणे जिल्ह्यातून रायगड रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय झाली होती.

महाड : महाड पंढरपूर राज्य मार्गावरील वरंध घाटांमधून कोकणामध्ये गणेशोत्सवाकरिता दाखल होणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊन देणार नाही. असे प्रतिपादन महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भरत गोगावले यांनी केले आहे .

वरंध घाटांमधील माझेरी गावाच्या नजीक सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे घाटांमध्ये दगडी तसेच संरक्षक भिंत कोसळली असल्याने घाट रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीकरिता बंद केली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाकरिता पुणे जिल्ह्यातून रायगड रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय झाली होती. याची दखल घेत महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, स्थानिक ग्रामपंचायतीमधील कार्यकर्ते, शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या समवेत वरंध घाटांमधील परिस्थितीची पाहणी केली. 

रस्त्यातील अडथळे दूर करून हा रस्ता छोट्या वाहनांना करिता सुरू करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे महाड कार्यालयातील कार्यकारी अभियंता यांना दिल्या आहेत. घाटरस्ता नैसर्गिक पाण्याचा निचरा होत नसल्याने नादुरुस्त झाला आहे. किंवा मोबाईल केबल टाकल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांविरोधात कारवाईची मागणी करणार असल्याचे आमदार गोगावले यांनी वरंध घाटाच्या पाहणी दौऱ्यानंतर बोलताना स्पष्ट केले आहे. 

अतिवृष्टीमुळे दरड कोसळणे संरक्षक भिंतींची पडझड या घटनांमुळे पुणे जिल्ह्यातून तर कोकणामध्ये दाखल होणाऱ्या चाकरमान्यांची तसेच  व्यापाऱ्यांची गैरसोय होत असते, मात्र या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आल्याने ही समस्या येणाऱ्या काळात कायमस्वरूपी मार्गी लागेल अशी माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे .