indian robber

महाड: प्रियकराबरोबर पळून गेलेल्या पत्नीने आपल्या नवऱ्याच्या घरातून ७ लाख ६३ हजार ६०० रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल आठ महिन्यांनी या प्रकरणी ही महिला आणि तिचा प्रियकर आणि अन्य एक साथीदार यांच्याविरुद्ध महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाड: प्रियकराबरोबर पळून गेलेल्या पत्नीने आपल्या नवऱ्याच्या घरातून ७ लाख ६३ हजार ६०० रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार(robbery by wife in first husband`s home) उघडकीस आला आहे. तब्बल आठ महिन्यांनी या प्रकरणी ही महिला आणि तिचा प्रियकर आणि अन्य एक साथीदार यांच्याविरुद्ध महाड(mahad) शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल(crimerecord) करण्यात आला आहे.

महाड तालुक्यातील राजेवाडी येथे राहणारी अलमास नईम सावंत  ही महिला मार्च २०१९ मध्ये आपला प्रियकर तनवीर अलीसाहब कुंभार्लीकर याच्या बरोबर पळून गेली होती. त्यानंतर पहिल्या पतीला तलाक न देताच तिने तनवीर बरोबर विवाह केला. त्यानंतर ही महिला १६ डिसेंबर २०१९ रोजी पुन्हा राजेवाडी येथे आली. आणि आपला पहिला पती नईम अकबर सावंत याला दुधातून गुंगीचे औषध देवून तिने झोपविले. त्यानंतर या महिलेने बनावट चावीने नईमच्या आईचे कपाट उघडून कपाटातील सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, एक लॅपटॉप आणि दोन मोबाईल असा ७ लाख ६३ हजार ६०० रुपयांचा ऐवज घेवून पलायन केले. जाताना पहिल्या पतीपासून झालेल्या दोन मुलांनाही तिने आपल्या बरोबर नेले. या चोरी प्रकरणात या महिलेला तिचा दुसरा पती तनवीर आणि त्याचा भाऊ तबरेज यांची साथ होती.

या चोरी प्रकरणी या महिलेचा पहिला पती नईम अकबर सावंत यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या चौकशीअंती शहर पोलिसांनी अलमास नईम सावंत (वय २६), तनविर अलिसाहब कुंभार्लीकर (वय ३०, रा . चिपळूण ), आणि तबरेज अलीसाहब कुंभार्लीकर (वय २८ वर्षे ) या तिघांविरुद्ध भा.दं.वि.कलम ४२०, ४०६, ४९४, ३२८, ३८०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरिक्षक शैलेश सणस हे करित आहेत. सध्या हे आरोपी कलकत्ता येथे वास्तव्यास असल्याचे समजते.