खालापूरच्या धरणामध्ये बुडालेला दिल्लीतील तरुण, अखेर मृतदेह शोधण्यात पोलिसांना आले यश

पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी चार मित्र खालापूरमधील(khalapur crime फार्म हाऊसवर आले होते. यातील पुणे येथे आय टी मध्ये कामाला असलेला मात्र मुळचा दिल्लीचा अफताब शेख अचानक १४ तारखेला पहाटे ३ वा. आपल्या टेेंटमधुन बाहेर निघाला.

    खोपोली: अफताब शेख नावाचा दिल्लीतला एक तरुण मित्रांसोबत खालापुर तालुक्यातील आडोशी येथील धरणा शेजारी असलेल्या फार्ममध्ये मित्रांसोबत पर्यटन आला होता. मात्र १४ मार्च रोजी पहाटेपासुन तो गायब झाला होता. फार्म हाऊसमधुन गायब असलेल्या अफताब शेखचे कपडे, पाकिट धरणा शेजारी सापडले. आडोशी धरणात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टीमने पोलीस प्रशासनाच्या मदतीने शोध मोहीम सुरु केल्याने अखेर आज सकाळच्या सुमारास आडोशी धरणामध्ये बुडालेल्या दिल्लीतील युवकाचा मृतदेह सापडला आहे. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेच्या सदस्यांनी खोपोली पोलीसांच्या मार्गदर्शनाखाली मृतदेह काढून पोलिसांच्या ताब्यात दिला.

    खालापुर तालुक्यातील ताकई आडोशी रोडवर असलेल्या धरणालगत असलेल्या तातुराम पाटील यांचे फार्महाऊस एका कंपनीने करारावर घेतल्याने या ठिकाणी पर्यटनास व वर्क फ्रॉम होम असलेले आय टी प्रोफेशनल या ठिकाणी येत असतात. तसेच या ठिकाणी टेंट हाऊस पुरवले जातात.

    पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी चार मित्र  खालापूरमधील फार्म हाऊसवर आले होते. यातील पुणे येथे आय टी मध्ये कामाला असलेला मात्र मुळचा दिल्लीचा अफताब शेख अचानक १४ तारखेला पहाटे ३ वा. आपल्या टेेंटमधुन बाहेर निघाला. मात्र सकाळी अफताब यांच्या मित्रांच्या लक्षात आल्याने त्यांनी शोधाशोध सुरु केल्यावर फार्म हाऊस शेजारी असलेल्या धरणा लगत अफताबचे कपडे, पाकिट इत्यादि साहीत्य सापडले. अफताब सोबतच्या मित्रांनी हे खोपोली पोलीस स्टेशनला कळविल्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश अस्वर, उप पोलीस निरीक्षक वळसंग सह ग्रामस्थांनी आडोशी धरणात शोधाशोध केली. मात्र कोणतेही शव सापडले नसल्याने सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरुच होती.

    याबाबत खोपोली पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग रिपोर्ट दाखल करण्यात आला होता. मात्र अफताब शेख यांच्या मृत्यूबाबत गुढ वाढले असताना वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. पोलीस यंत्रणेने शोध मोहीम राबवित अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीच्या टिमच्या साहाय्याने आडोशी धरणामध्ये बुडालेल्या दिल्लीतील युवकाचा मृतदेह शोधून काढला. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेच्या सदस्यांनी खोपोली पोलीसांच्या मार्गदर्शनाखाली मृतदेह काढुन पोलिसांच्या ताब्यात दिले.  या घटनेचा रितसर गुन्हा दाखल करुन खोपोली पोलीस अधिक तपास करत आहेत.