raigad fort

महाड: स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरील(raigad fort) जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाची(zp rest house at raigad fort) तात्काळ दुरुस्ती करावी(repairing) अशी मागणी महाड तालुक्यातील वरंध जिल्हा परिषद मतदार संघाचे रायगड जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर यांनी लेखी निवेदनाद्वारे रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांकडे केली आहे.

महाड: स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरील(raigad fort) जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाची(zp rest house at raigad fort) तात्काळ दुरुस्ती करावी(repairing) अशी मागणी महाड तालुक्यातील वरंध जिल्हा परिषद मतदार संघाचे रायगड जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर यांनी लेखी निवेदनाद्वारे रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांकडे केली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, रायगड जिल्हा परिषदेच्या ९ सप्टेंबर २०२० रोजीच्या सर्वसाधारण सभेमध्ये महाड तालुक्यातील विविध समस्यांबाबत प्रश्न उपस्थित करून जिल्हा परिषद अध्यक्षांचे लक्ष वेधून घेतले होते, मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आलेल्या सभेमध्ये मोबाईल नेटवर्क इंटरनेटबाबत तांत्रिक अडचण निर्माण झाल्या असल्याने रायगड जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर यांनी लेखी निवेदन देऊन जिल्हा परिषद अध्यक्षांचे महाड तालुक्यातील विविध समस्यां सोडविण्यासाठी सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित करून लक्ष वेधले आहे.

यामध्ये कोरोना विषाणूच्या महामारी मध्ये रायगड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्याच्या साधनांचा तुटवडा भासत आहे तसेच कोरुना महामारीमुळे अतिदक्षता विभाग क्ष किरण विभाग ऑक्सिजन व्हेंटिलेटर रॅपिड अँटीजनकीट याचा सगळीकडेच आभाव आहे, त्यासाठी तरतूद करावी अशी मागणी केली.

ज्या आरोग्य कर्मचारी व पीएमडब्ल्यू तसेच एनआरएचएम या सगळ्यांनी कोविड- १९ मध्ये सुट्ट्या घेतल्या असल्यास त्यांच्यावर कारवाई व्हावी तसेच प्राथमिक शिक्षकांच्या लावलेल्या कोविड -१९ मधील ड्युटी आणि यामध्ये जे गैरहजर राहिले त्यांच्यावर कारवाई व्हावी, असे रायगड जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेच्या प्रश्न उत्तराच्या निवेदनामध्ये नमूद केले.

मनोज काळीजकर यांच्या मागणीची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आपल्या विभागाशी संबंधित माहिती तात्काळ सादर करावी अशा सूचना रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मार्फत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरील रायगड जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाची तात्काळ दुरुस्ती व्हावी अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे वाहन चालक सफाई कामगारांचे वेतन ८ ते ९ महिने दिले गेले नसल्याने चालकांच्यावर आर्थिक संकट ओढवले असून त्यांचे वेतन जिल्हा परिषद ठेव रकमेतून अदा करणे द्यावे,अशी मागणी केली आहे.

रायगड जिल्हा परिषदेने सन २०२०/२०२१ मध्ये १२५ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. मात्र कोविड -१९ असल्याने आपण अद्याप कोणतीही विकास कामे करू शकलो नाही. त्यामुळे अर्थसंकल्पातील याची जास्त रक्कम विकासासाठी खर्च करावी अशी मागणी केली आहे.