रक्षाबंधनाच्या दिवशी ‘अशा’ प्रकारे सजवा ओवाळणीचे ताट; ‘या’ सात गोष्टी ताटात नक्की असाव्या

नारळाला पूजे श्रीफळ म्हटले जाते. नारळ राहू ग्रहाशी संबंधित आहे. बहीण पूजन झाल्यानंतर भावाला जेव्हा नारळ देते तर त्याचा अर्थ असा होतो

  रक्षाबंधनाचा (rakshabandhan 2021) दिवस म्हणजे भाऊ बहिणीच्या प्रेमाचा दिवस. लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली या दिवसाची सर्वात जास्त वाट बघत असतात. कारण हा दिवस म्हणेज त्यांच्या हक्काचा त्यांच्या सुट्टीचा दिवस असतो. बहीण आपल्या भावाला जेव्हा राखी बांधायला येते तेव्हा ती एका ताटात कुंक, तांदूळ, नारळ, राखी , मिठाई, दिवा व पाण्याने भरलेला कलश अशी संपूर्ण सामग्री घेते व ताट सजवते. भावाला ओवाळताना या ७ वस्तू ताटात असणे अनिवार्य आहे. पूजेच्या ताटात या ७ वस्तू ठेवण्यामागे काय कारण आहे? याचे काय महत्व आहे ते आता आपण पाहूया.

  कुंकू – मित्रानो ओवाळताना बहीण सर्वप्रथम कुंकवाचा टिळा लावते. कुंक सूर्य ग्रहाशी संबंधित आहे. कुंकवाचा टिळा लावल्याने भावावर सूर्यदेवाची कृपा दृष्टी पडते व बहीण भावासाठी सूर्य देवांकडे प्रार्थना करते की येणाच्या वर्षात आपल्या भावाला सर्वप्रकारचे यश व प्रसिद्धी मिळावी.

  तांदूळ – कोणत्याही पूजेत तांदळाला सर्वात शुभअ मानले जाते आणि तांदळाशिवाय कोणतेही पूजन पूर्ण होत नाही. बहीण आपल्या भावाला कपाळावर कुंक लावून त्यावर तांदूळ लावते. जे शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. बहीण अशी प्रार्थना करते की माझ्या भावाच्या जीवनात सर्व प्रकारची शुभता व पवित्रता यावी. माझे आणि भावाचे संबंध कायम असेच प्रेम भावनेने टिकन राहावे.

  नारळ – नारळाला पूजे श्रीफळ म्हटले जाते. नारळ राहू ग्रहाशी संबंधित आहे. बहीण पूजन झाल्यानंतर भावाला जेव्हा नारळ देते तर त्याचा अर्थ असा होतो की येणाच्या वर्षात माझ्या भावाला सर्व प्रकारच्या सुख सुविधा मिळत राहोत व त्याचे जीवन आरामदायक आनंदी असो.

  राखी – मित्रानो राखी नेहमी उजव्या हातात मनगटावर बांधली जाते. है मंगळ ग्रहाशी संबंधित आहे याद्वारे असा संदेश मिळतो की बहीणीची प्रार्थना आहे तिच्या भावाने तिचे प्रत्येक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संकटात रक्षण करावे.

  मिठाई – राखी बांधून झाली की बहीण भावाला मिठाई भरवते व त्याचे तोंड गोड करते. मिठाई गुरु ग्रहाशी संबंधित आहे. त्याद्वारे अशी प्रार्थना केली जाते की माझ्या भावावर देवी लक्ष्मीची कृपा सदैव असावी. भावाची मुले मुली त्याचे वैवाहिक जीवन सुखी आणि आनंदी राहावे.

  दिवा- मित्रानो बहीण आपल्याला भावाला दिव्याने ओवाळते. दिवा शनी व केतू ग्रहाशी संबंधित आहे बहीण आपल्या भावासाठी प्रार्थना करते की माझ्या भावाच्या जीवनात येणारे सर्व रोग, सर्व प्रकारच्या बाधा आणि त्रास दूर व्हावे. पाण्याने भरलेला

  कलश – बहीण पाण्याने बहरलेल्या कलशाने भावाची पूजा करते. पाण्याने भरलेला कलश चंद्राशी संबंधित आहे. ओवाळताना बहीण अशी प्रार्थना करते की  माझ्या भावाच्या जीवनात मानसिक शांतता रहावी. त्याला कोणत्याही प्रकारचे टेन्शन असू नये. त्याने आपले जीवन शांततेत जगावे.