raksha bandhan bollywood songs story

रक्षाबंधनाचा(Raksha Bandhan 2021) सण प्रत्येक बहिण -भावासाठी खास असतो. संपूर्ण देशभरात हा सण साजरा केला जातो. रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक बहिण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधत असते. बहिण - भावाचे नाते किती घट्ट आहे हे दाखवणारे अनेक सिनेमे आपण आजवर बघितले असतील. बॉलिवूडची अशी काही गाणी(Bollywood Raksha Bandhan Special Songs) आहेत जी प्रत्येक बहिण - भावाला त्यांच्या नात्याची आठवण करुन देतात. रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपण बहिण - भावाचे प्रेम(Relation Of Brother And Sister) दाखवणाऱ्या गाण्यांची माहिती घेणार आहोत.

  १. ‘काजल’ या १९६५ साली आलेल्या चित्रपटामधील ‘मेरे भैया मेरे चंदा’ हे गाणे रक्षाबंधनाचे गाणे म्हणून आजही लोकांना आवडते. आशा भोसले यांनी हे गाणे गायले आहे.

  २. १५ डिसेंबर १९७२ ला रिलीज झालेल्या ‘बेईमान’ या चित्रपटातील ‘यह राखी बंधन है ऐसा’हे गाणे बहिण – भावाचे नाते दाखवते. लता मंगेशकर यांनी हे गाणे गायले आहे.

  ३.१९७१ साली देवानंदचा गाजलेला ‘हरे राम हरे कृष्णा’ हा चित्रपट बहिण – भावाच्या नात्यावरच आधारित आहे. या चित्रपटातील ‘फूलों का तारों का सबका कहना है’ हे गाणे कुणीही कधीच विसरू शकणार नाही. किशोर कुमारच्या आवाजातील गाणे आजही अनेकजण गुणगुणताना दिसतात.

  ४. ‘तिरंगा’हा देशभक्तीवर आधारित गाजलेला सिनेमा. १९९३ साली आलेल्या या चित्रपटातील ‘मेरे राखी का मतलब है प्यार भैया’हे गाणे अनेक बहिण – भावांचे आवडते गाणे आहे. साधना सरगम यांनी हे गाणे गायले आहे.

  ५. १९५९ सालच्या ‘छोटी बहना’या चित्रपटातील ‘भैया मेरे राखी के बंधन को निभाना’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे.

  बहिण – भावाच्या नात्यावर आधारित कोणते गाणे तुम्हाला आवडते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.