दूध का दूध पानी का पानी होणार, फडणवीसांच्या आरोपांवर गृहमंत्री आज  देणार स्पष्टीकरण

भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्यासाठी सरकारी वकील व एसपीमार्फत षड्यंत्र रचल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता. या आरोपांना दिलीप वळसे-पाटील आज विधानसभेत उत्तर देणार होते

    मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांवरील माझे संपूर्ण उत्तर तयार होते. मात्र त्यांनीच विनंती केली की मी आज नसल्याने यावर उत्तर गुरुवारी द्या.त्यांची ही विनंती मी मान्य केली. आता उद्या, गुरुवारी विधानसभेत मी याचे उत्तर देणार आहे. त्यातून दूध का दूध पानी का पानी होणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.

    भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्यासाठी सरकारी वकील व एसपीमार्फत षड्यंत्र रचल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता. या आरोपांना दिलीप वळसे-पाटील आज विधानसभेत उत्तर देणार होते. दरम्यान, विधिमंडळाच्या आवारात याच विषयावर पत्रकारांशी बोलताना गुरुवारी माझ्या उत्तरात ‘दूध का दूध पानी का पानी होईल’ असेही वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.

    m