राज ठाकरेंवर होणारी शस्त्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी मनसेतर्फे रुद्राभिषेक

या रुद्राभिषेक नंतर हनुमान चालीसा पठन देखील करण्यात येणार आहे.

    नवी मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज शस्त्रक्रिया होणार आहे. ही शस्त्रक्रिया निर्वि्घ्नपणे पार पडावी यासाठी  वाशी येथील शिव मंदिरात मनसेतर्फे रुद्राभिषेक करण्यात आला. राज ठाकरे यांच्यावर हिप बो ची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ही शस्त्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी मनसे कार्यकर्त्यांमार्फत हा रुद्राभिषेक करण्यात येतोय. या रुद्राभिषेक नंतर हनुमान चालीसा पठन देखील करण्यात येणार आहे.