मालवणमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या नौकेसह बचाव करण्यास गेलेली नौकाही बुडाली, १ जण बेपत्ता

  • या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेची पाहणी करुन बचावकार्याच्या सुचना दिल्या. तेथील ग्रामस्थांच्या मदतीने एका मच्छिमारासाठी शोधमोहि सुरु केली. हे मच्छिमार सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मच्छिमारायला निघाले होते. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पात पाण्यात खेचली गेली आणि ही घटना घडली आहे.

मालवण – मालवण येथील सर्जेकोट खाडीपात्रात मासेमारी करण्यास गेलेली नौका बुडाली. मच्छीमार सर्जेकोट खाडीपात्रात मासेमारीला गेले होते. समुद्राच्या मुखाजवळ पोहोचले असताना लाटांच्या तडाख्याने मच्छीमार नौकेबाहेर फेकले गेले. नौका बुडू लागल्याने बचाव करण्यासाठी आलेली नौका देखील लाटांच्या तडाखामुळे डबघाईला येऊन बुडाली. दोन्ही नौकेतील मच्छीमार पाण्यात फेकले गेले. नौकांवरील १० मच्छिमार पोहत ४० ते ६० मिनिट पोहत किनारी पोहोचले. त्यातील २ मच्छिमरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तस नौकेवरील दिवाकर जानू देऊलकर (वय २६) हा मच्छिमार परता नसल्याने बेपत्ता आहे. शनिवारी (दि १८ जुलै) सकाळी ०८च्या सुमारास ही घटना घडली आहे. 

या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेची पाहणी करुन बचावकार्याच्या सुचना दिल्या. तेथील ग्रामस्थांच्या मदतीने एका मच्छिमारासाठी शोधमोहि सुरु केली. हे मच्छिमार सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मच्छिमारायला निघाले होते. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पात पाण्यात खेचली गेली आणि ही घटना घडली आहे.