उन्हवरे खाडीपट्टयात ११ घरांचे नुकसान, आमदार योगेश कदम घटनास्थळी

महसूल विभागाकडून नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. तहसीलदार वैशाली पाटिल यानी पंचनामे पूर्ण करुन तात्काळ अहवाल तयार करण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्त घरांना आपण शासनाकडून जास्तीतजास्त आर्थिक मदत मिळवून देऊ अशी ग्वाही आमदार योगेश कदम यांनी दिली आहे.

    दापोली : दापोली तालुक्यात उन्हवरे, फरारे,वावघर या खाडीपट्टा परिसरात सोमवारी झालेल्या तुफान पाऊसामुळे जवळपास १० ते १५ घरांचे मोठे नुकसान झाले आहे. धान्य,कपडे आदींच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्त्यावरही काही ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. या सगळ्या भागाची पहाणी आमदार योगेश कदम, तहसीलदार वैशाली पाटील यांनी मंगळवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन केली आहे.

    यावेळी महसूल विभागाकडून नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. तहसीलदार वैशाली पाटिल यानी पंचनामे पूर्ण करुन तात्काळ अहवाल तयार करण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्त घरांना आपण शासनाकडून जास्तीतजास्त आर्थिक मदत मिळवून देऊ अशी ग्वाही आमदार योगेश कदम यांनी दिली आहे.

    भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. दरम्यान या परिसरातील खाडीमध्ये गाळ काढणे,धूप प्रतिबंधक बंधारा बांधणे यासाठी प्रयत्न करून संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यावर योग्य त्या उपाययोजना केल्या जातील यासाठी आमदार योगेश कदम प्रयत्नशील आहेत. नुकसानग्रस्ताना न्याय देण्यासाठी आमदार योगेश कदम यांनी स्वतः घटनास्थळी मंगळवारी सकाळी भेट दिली आहे.

    येथील ग्रामस्थांजवळ संवाद साधून त्यांना धीर दिला आहे.अशी माहिती सेनेचे तालुकाप्रमुख प्रदीप सुर्वे यांनी दापोलीत पत्रकारांजवळ बोलताना दिली. दरम्यान या नुकसानग्रस्त भागात नेमके किती नुकसान झाले आहे याची आकडेवारी मंगळवारी सायंकाळी उशिरा पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच समजू शकणार आहे.यासाठी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी,तलाठी यांच्याकडून कार्यवाही सुरू आहे.