चार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प

चार दिवसाच्या पावसात तालुक्यातील सर्वच लहाने मोठे ओढे परे दुथडी भरुन वहात असल्याने लहान मोठ्या मोऱ्यावरुन पाणी गेल्याने वाहतूक ठप्प होत अनेक ठिकाणांचे गाडी मार्ग बंद झाल्याने अनेक गावातील ग्रामस्थांनी पायवाटेचा आधार घ्यावा लागला. खेड दापोली व महाड या तालुक्याशी संपर्क असलेल्या सर्व मुख्य ठिकाणीवरील मार्गावर अनेक ठिकाणी पुलांवरुन पाणी गेल्याने तालुक्याचे गाडी मार्गाचा संपर्क बऱ्याच काळासाठी तुटला तो सुरळीत झाला आहे.

    मंडणगड –  चार दिवसांपासून मौसमी पावसाने धारण केलेले रौद्र रुप शनिवारी बदलताना दिसून आले. मंगळवार ते गुरुवार जोरदार कोसळणारा पाऊस शुक्रवारी थोडा कमी झाला तर शनिवार पावसाने पुर्ण विश्रांती घेतली. डोंगराळ संरचनेमुळे तालुक्यास पुराचा धोका नाही हे खरे असले तरी तालुक्यातील सावित्री भारजा निवळी या तिनही नद्या चार दिवस दुथडी भरुन वहात तिघीनीही धोक्याची पातळी गाठली होती.

    त्यांचे प्रवाह नदी पात्रापर्यंत ओसरलेले दिसून आले. ता.२३ जुलै रोजी पन्हळी खुर्द येथील बाळाराम गोविंद कप यांचा बैल नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला असून त्याचे शोधकार्य सुरू आहे. तर मुंबई, पुणे, महाडकडे जाणाऱ्या मार्गावर लाटवण येथील रस्त्यावरील मोरी खचल्याने मार्ग बंद करण्यात आला आहे. पावसामुळे चार दिवसात पडझड झाल्याची कोणतीही तक्रार आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे नोंद झालेली नसल्याची माहीती तहसिल कार्यालयातून मिळालेली आहे.

    तरी मांदीवली चिंचघऱ, कुंबळे तिडे, शेवरे, अडखळ कोंझर, चिंचाळी पन्हळी, म्हाप्रळ लोकरवण मार्गावरील मुख्य मोऱ्यावर पाणी वहात असल्याने वाहतूक ठप्प झाल्याने या गावाचा तालुक्याशी असलेला संपर्क काही काळासाठी तुटलेला दिसून आला.

    चार दिवसाच्या पावसात तालुक्यातील सर्वच लहाने मोठे ओढे परे दुथडी भरुन वहात असल्याने लहान मोठ्या मोऱ्यावरुन पाणी गेल्याने वाहतूक ठप्प होत अनेक ठिकाणांचे गाडी मार्ग बंद झाल्याने अनेक गावातील ग्रामस्थांनी पायवाटेचा आधार घ्यावा लागला. खेड दापोली व महाड या तालुक्याशी संपर्क असलेल्या सर्व मुख्य ठिकाणीवरील मार्गावर अनेक ठिकाणी पुलांवरुन पाणी गेल्याने तालुक्याचे गाडी मार्गाचा संपर्क बऱ्याच काळासाठी तुटला तो सुरळीत झाला आहे.

    विजेचा खेळखंडोबा सुरु- पावसाने रुद्र रुप धारण केल्याने व तालुक्यास विज पुरवठा करणाऱ्या दस्तुरी मंडणगड मार्गावर अनेक ठिकाणी झाडे पडून पोल पडल्याने मंगळवार ते शुक्रवार या चार दिवसात तालुक्यातील विज प्रवाह मात्र बहुतांश काळ खंडीतच राहीलेला आहे.

    बुधवार व गुरूवार दिवसरभर लाईटची नसल्याने त्याचा परिणाम बँकीग व्यवहार शासकीय व निमशासकीय कामकाजावर झालेला दिसून आला. विज प्रवाह खंडीत असल्याने तालुक्यातील दुरसंचार व्यवस्था कोलमडून पडली होती. या कालावधीत मोबाईल फोन्सची सगळ्याच टॉवर रेंज गायब राहील्याने इंटरनेट व्यवस्था कोलमडून पडलेली दिसून आली.

    पावसाबरोबरच भोळवली धरणातील पाणी सोडण्यात आल्याने भारजाने धोक्याची पातळी गाठली आहे. तिडे कुंबळे मार्गावर कुंबळे स्मशानभुमीवरील पाणी कमी झालेला नाही या मोरीवल पाण्याने मोठे भगदाड पडलेले आहे त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे यंदाचे हंगामात दुसऱ्यांदा ही मोरी पाण्याखाली आली आहे याकडे सार्वजनीक बांधकाम विभागाने पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

    मोरीचे परिसरात लाईट नसल्याने व मोरीवर मोठे भगदाड पडल्याने दुहेरी अपघाताची शक्यता आहे. यास समस्या व दुरावस्थाकडे दुर्लक्ष देणारा बांधकाम विभाग जबाबदार असल्याची प्रतक्रिया कुंबळे ग्रामपंचायतीचे सरपंच किशोर दळवी यांनी दिली आहे.

    मांदीवली पुल तिसऱ्यांदा पाण्याखाली – देव्हारे केळशी मार्गावरील चिंचघर मांदीवली पुल यंदा पावसात जुलै महिन्यात तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला. यामुळे परिसरातील शेतीही पाण्याखाली गेल्याने येथील ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे.

    म्हाप्रळ लोकरवण मार्गावरील पुर्णपणे खचलेल्या मोऱ्यावरुन गेले दोन दिवस पाणी जात आहे. पाणी पातळी अधिक असल्याने सर्वच ठिकाणांचे गाडी मार्ग ठप्प आहेत.
    तिडे, तुळशी, भोळवली येथील धरणे फुल्ल झाली आहे. चिंचाळी व पंदेरी धरण खोलून ठेवल्याने कोणताही धोका नाही.

    ओढे व पऱ्याना पाणी आल्याने सखल व मैदानी भागातील शेतीत ठिकठाणी पाणी शिरले आहे. यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज पाणी कमी झाल्यावरच येणार आहे मात्र अतिवृष्टी फटका तालुक्यास ओल्या दुष्काळाच्या रुपाने बसण्याची शक्यता आहे पावसाने रौद्र रुप धारण करण्यापुर्वी बहुतांश तालुक्यात खरीपाचे हंगामातील लावणीचे कामे पुर्ण झाली आहेत. 24 जुलै 2021 रोजी मंडणगड 97 मी.मी, म्हाप्रळ 84 मी.मी, देव्हारे 47 मी.मी, वेसवी 47 मी.मी, एकुण पाऊस 275, सरासरी पाऊस 68, एकुण पाऊस 2823 मिलीमीटर झाला आहे.