रत्नागिरीमध्ये पावसाचा रुद्रावतार, अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड आणि दरडी कोसळण्याचे प्रकार

गेल्या चोवीस तासांत पासून रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी(Heavy Rain In Ratnagiri) होत असून यामुळे काही ठिकाणी दरडी कोसळण्याचे(landslide In Ratnagiri) प्रकार घडले आहेत तर काही ठिकाणी घरांची पडझड झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

  रत्नागिरी : गेल्या चोवीस तासांत पासून रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी(Heavy Rain In Ratnagiri) होत असून यामुळे काही ठिकाणी दरडी कोसळण्याचे(landslide In Ratnagiri) प्रकार घडले आहेत तर काही ठिकाणी घरांची पडझड झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. गेल्या २४ तासात प्राप्‍त माहितीनुसार दापोली तालुक्यात काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य(Cloud Burst) पाऊस पडला तथापि यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

  रत्नागिरी जिल्ह्यात २४ तासात सरासरी १५६  मिमी तर एकूण १४०४.९० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.

  मंडणगड – १३२ मिमी, दापोली – ३१५.४० मिमी, खेड -१५१.५०, गुहागर -१५८.८०  मिमी, चिपळूण- २०९ मिमी, संगमेश्वर – १६२.७० मिमी, रत्नागिरी – १०४.९० मिमी, राजापूर – ६२.६० मिमी,लांजा- १०८ मिमी.

  जिल्हा नियंत्रण कक्षाकडून ७ सप्टेंबर २०२१रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची प्राथमिक माहिती पुढीलप्रमाणे आहे.

  दापोली तालुक्यातील मौजे बुरोंडी येथे ईस्माईल करंबेळकर,गुलाब मुजावर,कलिम मिरकर,विनोद जावकर, शबीर बुरोडीकर यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. जीवितहानी नाही.मौजे आसुद-गणेशवाडी रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतुक बंद आहे. चंद्रनगर-लाडघर रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतुक बंद आहे. सदर ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटविण्याचे काम चालू आहे.मौजे पाजपंढरी येथे गोवर्धन रामचंद्र पावसे यांच्या मालकीची  सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ नागरून ठेवलेल्या बोटीचे समुद्राच्या लाटेने २१६००० रुपयांचे नुकसान झाले आहे. मौजे पाजपंढरी येथे रत्नाकर जाना कालेकर यांच्या घराचे पावसामुळे अंशतः नुकसान झाले आहे. कोणतीही जिवीतहानी नाही. मौजे हर्णे येथील काही घरांचे पावसामुळे अंशतः नुकसान झाले आहे. कोणतीही जिवीत हानी नाही.

  मौजे अडखळ -मसोंडे स्त्यावर दरड कोसळल्याने वाहतुक बंद आहे. सदर ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटविण्याचे काम चालू आहे.चिपळूण तालुक्यातील मौजे टेरव येथे टेरव -खेर्डी रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतुक बंद आहे. सदर ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटविण्याचे काम चालू आहे. गुहागर तालुक्यातील मौजे गुहागर येथे वरचा पाट येथील बाग ते शिवाजी नगर मोहल्ला भागात पाणी शिरले आहे. लोकांना सुरक्षित स्थळी हलविलेले आहे. मौजे कोंड कारूळ येथे दिनार गोविंद शिरगावकर घराचे पावसामुळे ३८५००/- रुपयांचे अंशतः नुकसान झाले आहे. कोणतीही जिवीतहानी नाही.मौजे साखरी खुर्द, शृंगारतळी, आरे येथील घराचे पावसामुळे अंशतः नुकसान झाले असून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.