गुहागर पालपेणे येथील संजय दाभोळकर यांची कलाकृती, लाल दगडाच्या मातीपासून गणेश मूर्ती

शाळेतून आल्यानंतर या मुलींना मूर्त्यांना रंगकाम करावयास आवडते . गेल्या पाच वर्षापसून रंगकाम करणे व मुर्त्या बनविणे यामध्ये त्यानीही झोकून दिले आहे व याची आवडही निर्माण झाली आहे. या मुर्त्या अनेकजण मुंबई पुणे येथेही घेऊन जात असतात. तालुक्यातून दाभोळकर कुटुंबियांचे कौतुक होत आहे.

  गुहागर.  गुहागर तालुक्यातील पालपेणे गावाचे रहिवाशी संजय दाभोळकर यांच्या गणेश मूर्ती घडविण्याच्या कारखान्यात लाल दगडाच्या  मातीपासून गेली पाच वर्षे गणेश मूर्ती घडविल्या जात आहेत. त्यातून त्यांनी सामाजिक धार्मिक भावना आणि पर्यावरण अबाधित राखण्याचे सर्वोत्तम कार्य साधले असून त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे .

  इतरच्या व्यवसायाबरोबरच त्यांनी गणेश मूर्ती घडविण्याचा व्यवसायाला सुरुवात केली. त्यांच्या सुबक हस्तकलेला जनतेमधून तितकाच उत्तम प्रतिसाद मिळू लागला. पूर्वी ते शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवीत होते. मात्र कालांतराने त्यांनी पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दृष्टीने पाउल उचलून तालुक्यातील चिरेखाणी मधील माती आणून त्यांच्यामार्फत सुबक गणेशमूर्ती घडविण्याचे काम सुरु केले. त्यांच्या या सुबक आणि आकर्षक गणेश मुर्त्या तालुक्यात आणि जिल्हयात अत्यंत अल्पवधीत प्रसिद्धी पावल्या. जवळपास १५००  अथवा त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात मुर्त्यांची निर्मिती या कारखान्यात प्रतिवर्षी होत असते.

  त्याच लाल मातीचा उपयोग गणेश मूर्ती घडविण्यासाठी केल्यामुळे आर्थिक आवकही या धंद्यात वाढली आहे. तालुक्यातील इतर गणेश मूर्तीकारांनीही याचेच अनुकरण केल्यास पर्यावरण संरक्षणास हातभार लागू शकतो असे दाभोळकरांचे म्हणणे आहे . त्याच्या कामात त्यांच्या मुलींचाही हातभार लागतो.

  शाळेतून आल्यानंतर या मुलींना मूर्त्यांना रंगकाम करावयास आवडते . गेल्या पाच वर्षापसून रंगकाम करणे व मुर्त्या बनविणे यामध्ये त्यानीही झोकून दिले आहे व याची आवडही निर्माण झाली आहे. या मुर्त्या अनेकजण मुंबई पुणे येथेही घेऊन जात असतात. तालुक्यातून दाभोळकर कुटुंबियांचे कौतुक होत आहे.

  सुरुवातीला मी शाडूच्या मातीपासून मुर्त्या बनवीत असे. परंतु ते फार खर्चिक होते. आता मी स्थानिक चीरेखाणीतून चीऱ्याची धाव माती आणून त्यांच्या पासून मुर्त्या बनवितो . या मातीच्या मुर्त्या विसर्जित अल्पावधीत होतात आणि या मातीच्या मुर्त्यांवर आणखी रेखीव काम करताना अतिशय समाधान वाटते . त्यांच्या या पर्यावरण संरक्षण विषयक धोरणाविषयी सर्वच स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांना स्वतःला सुद्धायाविषयी अभिमान वाटतो. चीरेखाणीमधील माती अव्यातपणे फुकटच जाते.

  संजय दाभोळकर, मुर्तीकार