corona

राज्यभरात वाढत असलेलली कोरोना रुग्णांची संख्या चिंतेचा विषय बनली आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असताना नागरिक सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची सर्रासपणे पायमल्ली करत आहेत. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात एका व्यक्तीने निष्काळजीपणाचा अक्षरश: कळस गाठला आहे. कोरोना पॉझिटीव्ह असूनही या व्यक्तीने लग्नसोहळ्याला हजेरी लावली.

    रत्नागिरी: राज्यभरात वाढत असलेलली कोरोना रुग्णांची संख्या चिंतेचा विषय बनली आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असताना नागरिक सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची सर्रासपणे पायमल्ली करत आहेत. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात एका व्यक्तीने निष्काळजीपणाचा अक्षरश: कळस गाठला आहे. कोरोना पॉझिटीव्ह असूनही या व्यक्तीने लग्नसोहळ्याला हजेरी लावली.

    या व्यक्तीला मागील काही दिवसांपासून कोरोनाची लक्षणे जाणवत होती. त्यामुळे त्याने कोरोना चाचणी करुन घेतली होती. असे असताना हा व्यक्ती लग्नाला गेला.

    या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे या कोरोना रुग्णाला स्थानिक आरोग्य यंत्रणेकडून फोन केले जात होते. मात्र, हा व्यक्ती फोन उचलत नव्हता. त्यामुळे आरोग्य विभागाचे एक पथक संबंधित व्यक्तीच्या घरी येऊन धडकले. तेव्हा हा व्यक्ती एका गावात लग्नासाठी गेल्याचे समजते.

    अखेर आरोग्य यंत्रणेने सरपंच आणि पोलीस पाटलांशी संपर्क साधला. त्यानंतर सरपंच आणि पोलीस पाटील यांनी फोन करुन या व्यक्तीला लग्नमंडपातून बाहेर काढायला लावले. या प्रकारामुळे नागरीकांच्या निष्काळजीपणाचे करायचे काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

    दरम्यान, मागील २४ तासांत रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे २७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये महाविद्यालयातील ७ शिक्षकांचा समावेश आहे. तर संगमेश्वर आणि दापोलीतील दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा ३६२ वर पोहोचला आहे.