मुंबई : दिल्लीतील वकील अजय श्रीवास्तव हे कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या(underworld don daud ibrahim) रत्नागिरीतील(Ratnagiri) बंगल्याचे नविन मालक झाले आहेत. ११ लाख ३० हजारांना त्यांनी हा बंगला विकत घेतला आहे.

दाऊद इब्राहिमच्या ७ मालमत्तांचा आजा लिलाव झाला(dawood ibrahim property auction). व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात आलेल्या या लिलावात रत्नागिरी येथील दाऊदच्या वडिलो पार्जित बंगल्याचाही लिलाव झाला.

लिलाव झालेली दाऊदची सर्व मालमत्ता रत्नागिरीतील खेड जिल्ह्यात आहे. सेफमा अर्थात स्मगलर्स एंड फॉरेन एक्सचेंज मैनिपुलेटर्स एजन्सीकडून  हा लिलाव झाला. कोरोनामुळे फक्त ई-ऑक्शन आणि टेंडर मार्फत लिलाव करण्यात आला.

दाऊदच्या 7 पैकी 6 मालमत्तांचा लिलाव झाला आहे. इकबाल मिर्चीच्या मालमत्तेवर बोली लागली नाही. दाऊदचं घर आणि शेतीचा डिजीटल पद्धतीने मुंबईतून लिलाव झाला. मात्र, लिलावात मुंबके गावातील शेतकरी सहभागी झाले नाहीत. स्थानिक इच्छुक बोली लावणारे मुंबईत जाणार नाहीत, अशी माहिती माजी सरपंच अकबर दुदुके यांनी दिली.

दाऊदची संपत्ती घेणारे दोघेही दिल्लीतील असून व्यवसायाने वकिल आहेत. अजय श्रीवास्तव आणि भुपेंद्र भारद्वाज अशी त्यांचे नावे आहेत. दाऊदच्या सहापैकी चार संपत्ती वकील भूपेंद्र भारद्वाज यांनी जिंकल्या असून उर्वरित दोन संपत्ती वकील अजय श्रीवास्तव यांनी जिंकल्या आहेत.

दाऊदच्या संपत्तीचा दुसऱ्यांदा लिलाव झाला असून या वेळेस दाऊदचा रत्नागिरीतील बंगला लिलावातील आकर्षण होते. अजय श्रीवास्तव यांनी 11 लाख 30 हजारांना बोली लावून हा बंगला विकत घेतला.

यापूर्वी मुंबईतील दाऊदच्या जवळपास सर्व प्रॉप्रटींचा लिलाव झाला आहे. आता रत्नागिरीतील त्याची कौटुंबिक जमीन आणि घराचा ऑनलाईन पद्धतीनं लिलाव करण्यात आला.

दरम्यान, मुंबके गावातील मालमत्ता ही दाऊदची आई अमिना कासकर यांच्या नावावर आहे. आई आणि वडील दोघेही हयात नाहीत. 1993च्या मुंबई बॉम्ब स्फोटानंतर दाऊद फरार झाला.

कोकणातील दाऊदच्या वडिलोपार्जित जमीन सध्या त्याचे काका कसत आहेत. पण, आता लिलाव होत असेल तर सरकारच्या नियमांप्रमाणे व्हावे, अशी आशा दाऊदच्या काकांनी व्यक्त केली. दाऊदच्या मालमत्तेच्या लिलावाबाबत अनेकांना उत्सुकता होती.

 

हे सुद्धा वाचा