लोकांनी पोटापाण्यासाठी दारु विकली तर काय बिघडले ? तुम्ही पोलीस हप्ते घेत नाही का ? भास्कर जाधवांचा पोलिसांवर शाब्दिक हल्ला

भास्कर जाधव यांनी आपल्या गुहागर मतदरासंघातील एका राजकीय कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केले. अवैध दारुविक्रीसाठी कारवाई झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्याची त्यांनी पाठराखण केली. पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं ? तुम्ही पोलीस हप्ते घेत नाही का ?, असे म्हणत मी तुमच्या पाठीशी आहे असे भास्कर जाधव (Shiv Sena leader Bhaskar Jadhav ) यांनी जाहीरपणे सांगितले.

रत्नागिरी: भास्कर जाधव यांनी आपल्या गुहागर मतदरासंघातील एका राजकीय कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केले. अवैध दारुविक्रीसाठी कारवाई झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्याची त्यांनी पाठराखण केली. पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं ? तुम्ही पोलीस हप्ते घेत नाही का ?, असे म्हणत मी तुमच्या पाठीशी आहे असे भास्कर जाधव (Shiv Sena leader Bhaskar Jadhav ) यांनी जाहीरपणे सांगितले. कोकणातील राजकीय वर्तुळाता त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

काही दिवसांपूर्वी पोलिसांनी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख बाबू सावंत यांच्यावर कारवाई केली होती. भास्कर जाधव यांनी त्यांची पाठराखण करताना पोलिसांवर शाब्दिक (Coversial statement about Police) हल्ला चढवला. मात्र, भास्कर जाधव यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. फक्त दोन गोष्टींसाठी मला फोन करू नका मुलींची छेडछाड आणि चोरी. बाकी कोणत्याही गोष्टीला तुम्ही घाबरू नका, भास्कर जाधव तुमच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी म्हटले. त्यामुळे आता विरोधी पक्षांकडून हा मुद्दा उचलून सरकारची कोंडी केली जाण्याची शक्यता आहे.