vashishthi bridge

मुंबई-गोवा महामार्ग(Mumbai Goa Highway) व वशिष्ठी ब्रिज (Potholes On Vashishthi Bridge) वर मोठे खड्डे पडले आहेत.

    चिपळूण: मुंबई-गोवा महामार्ग(Mumbai Goa Highway) व वशिष्ठी ब्रिज (Potholes On Vashishthi Bridge) वर मोठे खड्डे पडले आहेत.हा ब्रिज ब्रिटिशकालीन असून तो वापरण्याची मुदत संपली आहे.तरीही नवीन ब्रिजचे बांधकाम सुरू असल्याने जुन्या ब्रिजवरूनच वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु असते .पावसामुळे या ब्रिज वर मोठे खड्डे पडले असल्याने पावसाच्या पाण्याच्या अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.

    मुंबई- गोवा महामार्ग सहित या ब्रिजवरील रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई – गोवा महामार्ग कामाचा शुभारंभ २०१७ ला झाला. जवळपास पाच वर्ष होत आली तरी ४७ टक्के काम झाले आहे.

    वशिष्ठी जुन्या ब्रिज शेजारी नवीन ब्रिजचे बांधकाम सुरू आहे. वाहतुकीसाठी वापरात येणाऱ्या जुन्या वशिष्ठी ब्रिजवरील खड्डे पाहता यावरून प्रवास करताना काळजी घेणे गरजेचे आहे.तसेच गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईमधून चाकरमानी कोकणात येतात आणि या महामार्गावर नेहमीपेक्षा जास्त वाहनांची वर्दळ असते. या महामार्गावर सध्या खड्डे पडल्याने वशिष्ठी ब्रिजला कुठेही तडा जाऊ शकतो,अशी परिस्थिती आहे. ब्रिजची व रस्त्यावरील खड्डे संबंधित विभागाने लक्ष देऊन भरून घ्यावे, अशी वाहन चालक नागरिकांतून मागणी होत आहे .