The two biggest enemies in politics together; Chief Minister Uddhav Thackeray-Narayan Rane will appear on one stage

रत्नागिरी : भाजप खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेच्या नेतृत्वावर शेलक्या शब्दात प्रहार केला आहे. शिवसेनेचे नेते मातोश्रीवरून बटण दाबून सगळे काही करू शकतात असे म्हणत राणे यांनी उल्लेख न करताच मुख्यमंत्र्यावर टिका केली आहे. दिल्लीत आणि मुंबईत झालेल्या शेतकरी आंदोलनात शिवसेना सहभागी झाली नव्हती. या मुद्यावरूनही नारायण राणेंनी शिवसेनेला चांगलेच फटकारले.

दिल्लीतील शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी मुंबईत शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनासाठी शिवसेना सहभागी झाली नव्हती. शिवसेना ही मागून असते. ते अंडरग्राऊंड असतात. मातोश्रीवरून बटण दाबले की रस्त्यावर आलो. शिवसेना सगळे बटण दाबून करते. मातोश्रीची सुरक्षा कडक केली आहे. त्यासाठी मातोश्रीला जाळ्या लावल्यात असा टोला त्यांनी लगावला.

थकित वीजबिल प्रकरणी सरकारने ग्राहकांना फसविले आहे. यावर नारायण राणेंनी महाविकास आघाडीवर टिका केली. ठाकरे सरकार काय हो पिंजऱ्यातून मातोश्रीतून बाहेर पडत नाही. मी हे करतो ते करतो असे मुख्यमंत्री सांगतात. एकीकडे वीजबिले माफ केली जाईल असे सांगायचे आणि दुसरीकडे वीज तोडायची ही ग्राहकांची फसवणूक आणि अन्याय आहे. या विरोधात भाजप आवाज उठवेल,” असा इशारा नारायण राणेंनी दिला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा यशस्वी होवो हीच शुभेच्छा. एखाद्या नेत्याला वाटले, दर्शन करावे, तर यावर काय बोलणार?. असे सांगत शुभेच्छा दौरा यशस्वी होवू दे अशी  सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाबाबतही नारायण राणेंनी शिवसेनेला फटकारले. पाण्याशिवाय कसे काय वर्षभरात तारीख जाहिर करतात. चिपी विमानतळासाठी पाणी, विद्युत परवठा आणि रस्त्यासाठी ३२ कोटी देवू शकले नाही. त्यामुळे शिवसेनेच्या अंगात पाणी नाही तर ते विमानतळाला पाणी कुठे देणार असा खोचक टोलाही राणेंनी लगावला.