शिवसेनेतील नाराजांवर भाजपचा डोळा, निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न

भाजपने (BJP) रत्नागिरीसह (Ratnagiri) जिल्ह्यात पाय पसरण्याच्या दृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्ह्यात ताकद असलेल्या शिवेसेनेतील (Shiv Sena) नाराजांवर भाजपचा डोळा आहे. त्यांना पक्षात घेण्यासाठी भाजप गळ टाकून आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सेनेच्या ज्येष्ठ नेत्याच्या गाठीभेटी घेतल्या. तसेच लवकरच ते पुन्हा रत्नागिरी दौऱ्यावर येणार आहेत.

रत्नागिरी : भाजपने (BJP) रत्नागिरीसह (Ratnagiri) जिल्ह्यात पाय पसरण्याच्या दृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्ह्यात ताकद असलेल्या शिवेसेनेतील (Shiv Sena) नाराजांवर भाजपचा डोळा आहे. त्यांना पक्षात घेण्यासाठी भाजप गळ टाकून आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सेनेच्या ज्येष्ठ नेत्याच्या गाठीभेटी घेतल्या. तसेच लवकरच ते पुन्हा रत्नागिरी दौऱ्यावर येणार आहेत.

सेनेचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती, शहरातील पदाधिकारी, असे सेनेतील दिग्गज भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. साम, दाम, दंड, भेद, आदीचा वापर करून सेनेचे खच्चीकरण करण्याचा भाजपचा डाव आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक वर्षांपासून भाजप अपयशाचा पाढा गिरवत आहेत. पहिले दोन आमदार असलेल्या भाजपकडे केंद्रात सत्ता असताना आता एकही आमदार नाही.

ग्रामपंचायतीदेखील हातातून गेल्या आहेत. जिल्ह्यात भाजप वाढण्य़ाऐवजी कमी होताना दिसत आहे. त्यामुळे आगामी ग्रामपंचायत , पालिका आदी निवडणुकांवर भाजपचा डोळा असणार आहे. तसेच या निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.