blue sea wave in night

मागील चार ते पाच वर्षांपासून थंडीच्या हंगामात निळ्या चकाकणाऱ्या लाटांचे दृष्य पाहायला मिळते. रत्नागिरीतील अनेक समुद्रकिनाऱ्यांवर हे विहंगम दृश्य पर्यटकांना अनुभवण्यास मिळत आहे.

रत्नागिरी : रत्नागिरीतील (Ratnagiri sea)  विविध समुद्र किनारी लाटांवर निळी चादर  (Blue shiny sheet) पसरल्याचे दृष्य पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून रात्रीच्यावेळी किनाऱ्यावर निळ्या चकाकणाऱ्या लाटा उसळत आहेत. त्यामुळे जणू किनाऱ्यावर चकाकणारी निळी चादरच पसरल्या सारखे दृश्य दिसत आहे. कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी (tourists) हे एक आकर्षण ठरले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करतात.

मागील चार ते पाच वर्षांपासून थंडीच्या हंगामात निळ्या चकाकणाऱ्या लाटांचे दृष्य पाहायला मिळते. रत्नागिरीतील अनेक समुद्रकिनाऱ्यांवर हे विहंगम दृश्य पर्यटकांना अनुभवण्यास मिळत आहे. या लाटांमध्ये असलेल्या प्लवंग सूक्ष्म जीवांच्य ऊर्जेमुळे निळ्या रंगाची चकाकी प्राप्त होते. त्यामुळे किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा निळ्या रंगात चकाकताना दिसतात. लाटा आपटताना या सूक्ष्मजीवांमध्ये ऊर्जा निर्माण होते. त्यामुळेच त्यांना निळा रंग प्राप्त होऊन चकाकी येते. स्थानिक मच्छिमार या सूक्ष्म जीवाला ‘पाणी पेटल’ किंवा ‘जाळ’ असे म्हणतात.

पूर्वी ह्या लाटा कमी प्रमाणात चकाकत होत्या. म्हणजेच अगदी लक्षातही न येण्या इतके प्रमाण होते. परंतु आता या सूक्ष्म जीवांचे प्रमाण वाढल्यामुळे लोकांच्या नजरेत येत आहे. दरवर्षी थंडीचा मोसम सुरु झाला की, हे प्लवंग सूक्ष्मजीव मोठ्या प्रमाणात समुद्र किनारी दाखल होतात. या सूक्ष्मजीवांना नॉकटील्युका असेही म्हणतात. या सूक्ष्म जीवांमध्ये जैविक प्रकाश निर्माण करण्याची क्षमता असते. त्यामुळेच लाटा आपटल्या की यांमध्ये हा प्रकाश निर्माण होऊन निळा चकाकणारा रंग दिसतो.