कशेडी घाटात बस कोसळली, अपघातात एकाचा मृत्यू तर १५ प्रवासी जखमी

कशेडी घाटात (Kashedi Ghat) भोगाव येथे चिंतामणी ट्रॅव्हल्सची (Chintamani Travels) बस दरीत कोसळली. यामध्ये दुर्दैवीपणे एका सात वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू (Death) झाला आहे. तसेच बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं असून उपचारासाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात ( Poladpur Hospital)  दाखल करण्यात आलं आहे.

रत्नागिरी: कशेडी घाटात (Kashedi Ghat) बस कोसळल्याची घटना समोर आली आहे. ही बस खासगी असून तब्बल ५० फूट खूल (Bus falls into 50 ft) दरीत ही बस कोसळली आहे. या अपघातात सुमारे १५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कशेडी घाटात भोगाव येथे चिंतामणी ट्रॅव्हल्सची (Chintamani Travels) बस दरीत कोसळली. यामध्ये दुर्दैवीपणे एका सात वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू (Death) झाला आहे. तसेच बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं असून उपचारासाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात ( Poladpur Hospital)  दाखल करण्यात आलं आहे.

अपघातग्रस्त बस विरारहून कणकवलीला निघाली होती. बसमध्ये एकूण ३१ प्रवासी होते. चार वाजण्याच्या सुमारास कशेटी घाटात असताना या गाडीला अपघात झाला.अपघाताची माहिती मिळताच ‘१०८’ रुग्णवाहिका व एका स्वयंसेवी संस्थेची रुग्णवाहिका तातडीनं घटनास्थळी पोहोचली. मदतकार्य अद्यापही सुरू आहे.