बेपत्ता चिमुकलीचा मृतदेह सापडला खाडीत; भावासह खेळता खेळता झाली होती गायब

12 मार्च रोजी दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास मुस्लीम मोहल्ला येथे नुसेबा आणि तिचा भाऊ मोहम्मद सहीबोले हे दोघेही सायकल फिरवीत असता सायकल फिरवून झाल्यानंतर मोहम्मद सायकल ठेवण्यास घराकडे गेला. त्यावेळी नुसेबा तेथेच उभी होती. मोहम्मद सायकल ठेवून पुन्हा नुसेबाला घेण्यासाठी आला असता त्याला नुसेबा कोठेही आढळली नाही. तेंव्हा त्याने ही बाब कुटुंबीयांना सांगितली.

    दापोली :  रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील भोपण येथील मुस्लीम मोहल्ला येथून बेपत्ता झालेल्या नुसेबा हनीफ सहीबोले (6) या चिमुकलीचा मृतदेह सापडला आहे. शेजारील खाडीमध्ये तिचा मृतदेह समुद्रखाडी किनारी सापडल्याने खळबळ उडाली आहे.

    12 मार्च रोजी दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास मुस्लीम मोहल्ला येथे नुसेबा आणि तिचा भाऊ मोहम्मद सहीबोले हे दोघेही सायकल फिरवीत असता सायकल फिरवून झाल्यानंतर मोहम्मद सायकल ठेवण्यास घराकडे गेला. त्यावेळी नुसेबा तेथेच उभी होती. मोहम्मद सायकल ठेवून पुन्हा नुसेबाला घेण्यासाठी आला असता त्याला नुसेबा कोठेही आढळली नाही. तेंव्हा त्याने ही बाब कुटुंबीयांना सांगितली.

    ीगत्यानंतर पालकांसह सर्वांनी गावात सर्वत्र शोधाशोध सुरू केली. पण तिचा काही पत्ता लागला नव्हता. त्यानंतर हा प्रकार पोलिसांना कळविण्यात आला. पोलिसही परिसरात शोध घेण्यासाठी तळ ठोकून होते. अखेर रविवारी शेजारील खाडीत तिचा मृतदेह आढळल्याने परिसरातून हळहळ वेक्त होत आहे. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.