चिपळूण महापूर; जलप्रलयानंतर आता कचऱ्याचे आव्हान

कचरा उचलण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या अत्याधुनिक यंत्रणेची मोठी मदत सर्व कचरा पालिकेच्या कचरा प्रकल्पात टाकणे अशक्य असल्याने नवीन जागेचा शोध नुकसानीमुळे झालेल्या कचऱ्यात हजारो पाण्याच्या बाटल्यांची भर

    चिपळूण : महापूर ओसरल्यानंतर दुकाने आणि घरांमधील चिखल काढला जात आहे. त्याचबरोबर नुकसानीमुळे निर्माण झालेल्या कचऱ्याची मोठी समस्या समोर उभी ठाकली आहे.

    पूर ओसरून आठ दिवस झाले तरी आजही शहरातील रस्तोरस्ती खराब झालेल्या सामानाच्या कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. आठ दिवसांनंतरही अनेक ठिकाणी साफसफाई पूर्ण झाली नसल्याने या कचऱ्याची भरच पडत आहे. दुर्गंधी आणि रोगराई पसरू नये यासाठी नगरपालिका प्रशासन तसेच अनेक समाजसेवी संस्था कचरा उचलण्याचा प्रयत्न करीत आहेत.

    पंधरा हजार टन कचरा…

    या पुरामुळे नुकसान होऊन शहरात जवळपास पंधरा हजार टन कचरा गोळा होईल असा अंदाज आहे. आजपर्यंत सुमारे सोळाशे ते सतराशे टन कचरा उचलला गेल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.