रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट! एका महिन्याची आकडेवारी धक्कादायक…

या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८ एप्रिलपर्यंत नवीन बाधितांची संख्या दररोज सुमारे १०० ते १५० ने वाढत होती. पण ९ एप्रिल रोजी ती एकदम सुमारे शंभराने वाढून २५१ झाली. त्यानंतर जेमतेम ४ दिवस ती २०० ते २५० पर्यंत मर्यादित राहिली.

    रत्नागिरी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका राज्याच्या अन्य भागांप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यालाही बसला आहे. एप्रिल महिन्यात नवीन बाधित रुग्णांच्या संख्येने दहा हजारांचा टप्पा पार केला आहे. गेल्या वर्षी करोनाच्या पहिल्या लाटेत रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या काही हजारांपर्यंत मर्यादित राहिली होती. पण गेल्या मार्चपासून ही संख्या हळूहळू वाढू लागली आणि एप्रिल महिन्यात नवीन विक्रम प्रस्थापित केला.

    या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८ एप्रिलपर्यंत नवीन बाधितांची संख्या दररोज सुमारे १०० ते १५० ने वाढत होती. पण ९ एप्रिल रोजी ती एकदम सुमारे शंभराने वाढून २५१ झाली. त्यानंतर जेमतेम ४ दिवस ती २०० ते २५० पर्यंत मर्यादित राहिली.

    १९ एप्रिल रोजी त्यामध्ये तात्पुरती घट (२५९) दिसली, पण दुसऱ्याच दिवशी (२० एप्रिल) हा आकडा सहाशेवर (६८५) पोचला. त्यानंतरचे चार दिवस जिल्ह्यात दररोज ४५० ते ५५० करोनाबाधित रुग्ण आढळून येत होते.