Corona in Ganpati Pule temple too Corona positive patients found in Bhaktanivas; Excitement in Ratnagiri

गणपतीपुळ्याच्या भक्तनिवासमध्ये कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण कोरोना टेस्ट करुन आलेला होता. मात्र, रिपोर्ट येण्याआदीच तो रुग्ण भक्तनिवासमध्ये राहत होता. त्याचा रिपोर्ट पोझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

    रत्नागिरी : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाझत आहे. अशातच रत्नागिरीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गणपतीपुळ्याच्या मंदिरात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत.

    कोकणातही कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. अशातच रत्नागिरीच्या गणपती पुळे मंदिरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता विशेष खबरदारी घेतली जात आहे. अंगारक चतुर्थीच्या आधी गणपतीपुळे प्रशासन अलर्टवर होते.

    गणपतीपुळ्याच्या भक्तनिवासमध्ये कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण कोरोना टेस्ट करुन आलेला होता. मात्र, रिपोर्ट येण्याआदीच तो रुग्ण भक्तनिवासमध्ये राहत होता. त्याचा रिपोर्ट पोझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

    गणपतीपुळे भक्त निवास भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. भक्तनिवासमधील कर्मचाऱ्यांचेही स्बॅब टेस्ट घेण्यात आलेत.