
रत्नागिरी (Ratnagiri). अयोध्येतील राममंदिरासाठी संक्रांतीपासून वर्गणीचे काम सुरु होणार आहे. मकर संक्रांतीपासून चार लाखांहून अधिक स्वयंसेवक १२ कोटी कुटुंबाशी संपर्क साधतील. हे स्वयंसेवक गावागावांत जातील, असं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांनी सांगितले होते.
यानंतर शिवसेनेन सामनाच्या संपादकीयमधून यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर आता शिवसेना कार्यालय उभारणीसाठी मदत निधी घेतला जात असल्याचा एक फोटो शेअर करत भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.