विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनी केली रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी

दापोली : विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज कोकण दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रत्नागिरीमधील दापोलीमधील नुकसानग्रस्त भागांचा दौरा केला.

दापोली : विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज कोकण दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रत्नागिरीमधील दापोलीमधील नुकसानग्रस्त भागांचा दौरा केला. निर्सग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या सुपारी, नारळ बागांची पाहणी केली. शाळा, कोळीवाडे, घरे आदी विविध ठिकाणाच्या उदध्वस्त भागांची पाहणी केली. कोळी बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या. 

सुप्रसिध्द पर्यटन स्थळ आणि कासवांचे गाव म्हणून प्रसिध्द असलेल्या वेळास या गावाची पहाणी करून आज दौऱ्याचा प्रारंभ झाला. त्यानंतर केळशी या गावातील रत्नागिरी जिल्हा परिषद कार्यालय, बहुउद्देशीय कुणबी भवन येथील नुकसानग्रस्त ठिकाणांची पाहाणी करून नुकसानीचा आढावा घेण्यात आला. अंजर्ले आणि पाजपांढरी या गावाची पाहाणी करण्यात आली. दापोली मधील विविध गावातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. दापोली येथील गोपाळकृष्ण गोखले जिल्हा परिषद शाळा, मुर्डी क्र. १ या शाळेचेही मोठे नुकसान झाले असून या शाळेलाही भेट देण्यात आली. याप्रसंगी माजी मंत्री व आमदार रविंद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड , आमदार महेश बालदी, आमदार रमेश पाटील, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदर विनय नातू, बाळा माने, केदार साठे, भाऊ ईदाते, आदी उपस्थित होते.