रत्नागिरीतील उपजिल्हा रुग्णालयात ड्यूरा ऑक्सिजन प्रणाली सुरु, कोरोनाबाधितांवर उपचार करणे सुलभ होणार

राज्यात कोरोना विषाणूचा (Corona Virus) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध मार्ग शोधले जात आहे. रत्नागिरी (Ratnagiri ) जिल्ह्यातील खेड (Khed Taluka) तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात ड्यूरा ऑक्सिजन ही (Dura Oxygen System Launched ) अत्यावश्यक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

राज्यात कोरोना विषाणूचा (Corona Virus) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध मार्ग शोधले जात आहेत. रत्नागिरी (Ratnagiri ) जिल्ह्यातील खेड (Khed Taluka) तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात ड्यूरा ऑक्सिजन ही (Dura Oxygen System Launched ) अत्यावश्यक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांवर उपचार करणे सुलभ ( It Will Be Easier to Treat Corona Patients) होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

गेल्या काही महिन्यात कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण दाखल होत होते. तसेच या ठिकाणी आरोग्य सुविधा अपुऱ्या असल्याने रुग्णांवर उपचार करताना अनेक समस्या येत होत्या. या पार्श्वभूमीवर खेडमध्ये कोरोना उपचाराबाबतच्या चांगल्या सुविधा शासकीय स्तरावर उपलब्ध व्हाव्या अशी मागणी होत होती. या मागणीनुसार आता कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात ड्यूरा ओक्सगेन सारखी महत्वाची सुविधा उपलब्ध झाल्याने खेड व परिसरातील कोरोनाबाधितांवर इथल्या इथे उपचार करणे शक्य झाले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ बुटाला यांच्या प्रयत्नाने एचडीएफसी आणि बंधन बँकेच्या सौजन्याने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाला चार ड्यूरा सिलेंडर उपलब्ध झाले आहेत. तसेच कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाला उपलब्ध झालेल्या एका ड्यूरा सिलेंडरची क्षमता २५० इतकी आहे.