ratnagiri jilha bank

पुणे जिल्हा सहकारी बँक, सातारा जिल्हा सहकारी बँक, सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँक, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या चार बँकांना(ED Sent Letter To 4 banks) ईडीने पत्र दिले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या बँकेची ईडी चौकशी(Ed Inquiry) करु शकते.

  रत्नागिरी:जरंडेश्वर साखर कारखाना(Jarandeshwar Sugar Factory) कर्ज प्रकरणात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पत्र (Ed Letter To Ratnagiri District Co operative Bank)पाठविले आहे. बँकेने जरंडेश्वर कारखान्याला दिलेल्या कर्जाबद्दल माहिती मागवली असून १५ जुलैपर्यंत ही माहिती देण्याची मुदत आहे.

  या महिन्याच्या सुरुवातीला ईडीने या प्रकरणात जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली होती. त्यानंतर जरंडेश्वर कारखान्याला कर्ज पुरवठा करणाऱ्या चार जिल्हा सहकारी बँकांना आता ईडीने पत्र पाठविली आहेत.

  बँकेला ईडीचे पत्र आले असून त्यात बँकेकडून दिलेल्या कर्जाचा तपशील मागविण्यात आला आहे. बँकेकडून ८ कोटी रुपये पुणे जिल्हा बँकेला देण्यात आले आहे. थेट कोणत्याही कारखान्याला कर्ज दिलेले नाही. ईडीने बँकेकडे पत्र पाठवून त्यात कर्जाचा तपशील, तारण, परतफेड या बाबींची माहिती मागविली आहे.

  - डॉ. तानाजीराव चोरगे, अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

  पुणे जिल्हा सहकारी बँक, सातारा जिल्हा सहकारी बँक, सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँक, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या चार बँकांना ईडीने पत्र दिले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या बँकेची ईडी चौकशी करु शकते.

  चार बँकांना कर्ज पुरवठा कोणत्या आधारावर केला गेला आहे? त्या कर्जाची परतफेड नियमित होते का? तारण मालमत्ता कोणती?, याची माहिती ईडीने बँकेकडे मागितली आहे.