lote midc fire

लोटे एमआयडीसीतील एम आर फार्मा केमिकल कंपनीत ( fire at MR Pharma Chemical Company of Ratnagiri) भीषण स्फोट झाला आहे. आज सकाळी ११ वाजता ही दुर्घटना घडली आहे.

    खेड : रत्नागिरी(ratnagiri) जिल्ह्यातील खेडमधील लोटे एमआयडीसीत ( fire at Lote MIDC) पुन्हा एकदा एका कंपनीत स्फोट झाल्यामुळे भीषण आग लागली आहे.  घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे

    लोटे एमआयडीसीतील एम आर फार्मा केमिकल कंपनीत ( fire at MR Pharma Chemical Company of Ratnagiri) भीषण स्फोट झाला आहे. आज सकाळी ११ वाजता ही दुर्घटना घडली आहे.

    स्फोटाच्या भीषण आवाजाने कंपनीच्या आजूबाजूचा परिसर हादरून गेला.तसेच अनेक कंपन्यांच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहे. धुराचे लोट हे १० किलोमीटर अंतरावरून दिसून येत आहे.

    घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. घटनास्थळावर मदतकार्य सुरू आहे.

    आगीमुळे आणि स्फोटांमुळे लोटे परिसर अक्षरशः हादरून गेला होता. या दुर्घटनेत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली होती. कंपनीत कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी कंपनीबाहेर धाव घेतल्याने सुदैवाने जीवितहानी टळली होती. मात्र कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.

    लोटे एमआयडीसीमधील अपघाताची सहावी घटना आहे. मागील महिन्यात २० मार्च रोजी लोटे एमआयडीसीमधील घरडा केमिकल कंपनीमध्ये (Gharda Chemical Company) भीषण स्फोट झाला होता. तसंच लोटे औद्योगिक वसाहती (Lote MIDC)मधील प्लॉट नंबर १५ येथील श्री समर्थ इंजिनिअरिंग केमिकल कंपनीत (Shree Samarth Engineering Chemical Company) रिअ‍ॅक्टरचा स्फोट होऊन भीषण आग (Fire) लागली होती

    गेल्या आठवड्यातच लोटे औद्योगिक वसाहतीमधील श्री दुर्गा फाईन केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या केमिकल कंपनीला बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली होती.