रत्नागिरीतील रिफायनरी प्रकल्पाबाबत माजी मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांना दिला सल्ला

कोरोनाच्या संकटात (Corona Virus) डळमळीत झालेल्या अर्थव्यवस्थेला गती मिळण्यासाठी रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प (Ratnagiri refinery Project) महत्वाचा आहे. त्यामुळे या प्रकल्पाबद्दलचा विचार लवकर व्हावा, असा सल्ला राज्याचे माजी मुख्य सचिव द. म. सुखथनकर (Former Chief Secretary D. M. Sukthankar ) यांनी राज्य सरकारला (CM Uddhav Thackeray) दिला आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती येण्यासाठी नेमलेल्या टास्क फोर्सचा अहवाल सरकारने विचारात घ्यावा, असेही सुखथनकर यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरी : कोरोनाच्या संकटात (Corona Virus) डळमळीत झालेल्या अर्थव्यवस्थेला गती मिळण्यासाठी रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प (Ratnagiri refinery Project) महत्वाचा आहे. त्यामुळे या प्रकल्पाबद्दलचा विचार लवकर व्हावा, असा सल्ला राज्याचे माजी मुख्य सचिव द. म. सुखथनकर (Former Chief Secretary D. M. Sukthankar ) यांनी राज्य सरकारला (CM Uddhav Thackeray) दिला आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती येण्यासाठी नेमलेल्या टास्क फोर्सचा अहवाल सरकारने विचारात घ्यावा, असेही सुखथनकर यांनी म्हटलं आहे.

कोरोना काळातील संकटात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्स नेमली होती. या टास्क फोर्समध्ये पुणे इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष रघुनाथ माशेलकर, उपाध्यक्ष विजय केळळकर यांच्यासह अनेक दिग्गज मंडळींचा समावेश होता. रोजगार वाढवण्यासाठी आणि गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यासाठी रत्नागिरी रिफायनरी सुरु करण्याची या टास्क फोर्सने शिफारस केली होती.

दरम्यान, नाणार रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. नाणार रिफायनरी प्रकल्प होणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला भाजपने थेट आव्हान दिलं आहे. भाजपचे नेते आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी महाविकास आघाडीचं सरकार पडेल, पण रत्नागिरीचा रिफायनरी प्रकल्प होणारच असं खुलं आव्हान दिलं आहे.