मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यावर हातोडा; किरीट सोमय्या यांनी केली होती तक्रार

दापोली मधील मुरूडच्या समुद्र किनाऱ्यावर हा नार्वेकर यांचा हा बंगला आहे. या बंगल्याच्या बांधकामासाठी सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार किरीट सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरण विभागाकडे केली होती. नार्वेकरांच्या बंगल्या सोबतच अन्य देखील बंगल्यांचा यामध्ये समावेश आहे, ज्याबद्दल तक्रार करण्यात आलेली आहे. आता प्रत्यक्ष कारवाई सुरू झाल्यानंतर पहिला क्रमांक हा नार्वेकरांच्या बंगल्याचा लागल्याचे दिसून आले आहे.

    मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांचा मुरूड मधील बंगल्यावर तोडक कारवाई करण्यात आली आहे(Milind Narvekar Bungalow Getting Demolished). सीआरझेड नियमांचं उल्लंघन करून बांधकाम केल्याचा मिलिंद नार्वेकर यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या( Kirit Somaiyya) यांनी हा मुद्दा उचलून धरलेला होता.

    दापोली मधील मुरूडच्या समुद्र किनाऱ्यावर हा नार्वेकर यांचा हा बंगला आहे. या बंगल्याच्या बांधकामासाठी सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार किरीट सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरण विभागाकडे केली होती. नार्वेकरांच्या बंगल्या सोबतच अन्य देखील बंगल्यांचा यामध्ये समावेश आहे, ज्याबद्दल तक्रार करण्यात आलेली आहे. आता प्रत्यक्ष कारवाई सुरू झाल्यानंतर पहिला क्रमांक हा नार्वेकरांच्या बंगल्याचा लागल्याचे दिसून आले आहे.

    बंगला पाडण्याची कारवाई सुरू झाल्यानंतर ”करून दाखविले !!!! मिलींद नार्वेकरांचा बंगलो तोडला. मुरुड दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नर्वेकर यांचा बेकायदा बंगलो पाडण्याचे काम आत्ता सुरू झाले. पुढचा नंबर मंत्री अनिल परब रिसॉर्टचा उद्या मी दापोलीला जावून तोडकामाची पाहणी करणार.” असं किरीट सोमय्या यांनी ट्विट केलं आहे. यासोबत त्यांनी नार्वेकरांचा बंगला तोडला जात असल्याचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

    अनिल परब, मिलिंद नार्वेकरांची सीबीआय चौकशी करा – किरीट सोमय्यांची मागणी

    मिलिंद नार्वेकरांनी दापोली-मुरूड किनाऱ्यावर अनिल परब याच्या घरापासून काही फुटाच्या अंतरावर भव्य बंगला बांधण्यास सुरूवात केली आहे. या बंगल्यासाठी समुद्र किनाऱ्यावरील साडेचारशे झाडं कापली.आज त्या जागेची किंमत १० कोटी आहे, दोन मजली बंगल्याचं बांधकाम सुरू आहे आणि बहुतेक त्याला मार्गदर्शन पर्यारवणमंत्री आदित्य ठाकरेंचं आहे. कोणत्याही प्राधिकरणाकडून परवानगी घेतलली नाही.  अनिल परब यांच्या बंगल्यावर मिलिंद नार्वेकर जात असतात व मिलिंद नार्वेकरांच्या बंगल्यावर अनिल परब जात असतात, आणि या दोघांच्या बंगल्याची काळजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे घेतात.” असं भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी माध्यमांसमोर बोलून दाखवलं होते.