आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांची कोविड केअर सेंटरला अचानक भेट, परिस्थितीचा घेतला आढावा

राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर ( Health Minister Yadravkar) यांनी रत्नागिरी (Ratnagiri)  येथील एका कोविड केअर (Covid Care Center) सेंटरला अचानक भेट (Visit) देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.

रत्नागिरी : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर ( Health Minister Yadravkar) यांनी रत्नागिरी (Ratnagiri)  येथील एका कोविड केअर (Covid Care Center) सेंटरला अचानक भेट (Visit) देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी उपचार घेणाऱ्या रुग्णांशी विचारपूस करीत संवाद (Communication) साधला.

रत्नागिरीत येत असताना गुरुवारी रात्री कुवारबाव येथील डॉ. बाबासाहेब आंबडेकर सामाजिक न्याय भवनमधील कोविड केअर सेंटरला प्रत्यक्ष भेट दिली. येथील ७३ कोरोनाबाधित रुग्णांची आरोग्यविषयक चौकशी करीत काही रुग्णांशी संवाद साधला. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कोविड विषयक परिस्थितीची माहिती घेतली.

कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर येत्या १ ऑक्टोबरपासून राज्यमंत्री यड्रावकर हे रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते जिल्ह्यातील विविध कोविड केअर केंद्रांना भेटी देणार आहेत. तसेच त्यासंदर्भात आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचा आढावा घेणार आहेत.