lanja flood

धो धो कोसळणार्‍या पावसाने लांजा तालुक्यातील काजळी व मुचकुंदी नदीला आलेल्या पुरामुळे साटवली येथे मोठ्या प्रमाणात घरांमध्ये पाणी शिरले.तसेच निवसर भागात शेतीचे नुकसान झाले.

    लांजा : सतत आठ दिवस पडणाऱ्या पावसाने(Heavy Rainfall In Ratnagiri District) बुधवारी मध्यरात्रीपासून जोर धरल्याने लांजा तालुक्यातील(Flood In Lanja) काही भागातील वस्तीत पाणी भरल्याने एकच हाहाकार उडाला आहे. तसेच काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने घरांचे नुकसान झाले आहे.

    धो धो कोसळणार्‍या पावसाने लांजा तालुक्यातील काजळी व मुचकुंदी नदीला आलेल्या पुरामुळे साटवली येथे मोठ्या प्रमाणात घरांमध्ये पाणी शिरले.तसेच निवसर भागात शेतीचे नुकसान झाले असून या रस्त्यावरील दत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे. भांबेड या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचे नुकसान झाले असून याठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात भातशेती वाहून गेली आहे.

    वाघणगाव ,वेरवली कोंड रिंगणे आदी भागातील भर वस्तीत पाणी शिरले आहे. इसवली येथे सुरेश हातसकर आणि जानकी हातसकर यांच्या घरावर झाड कोसळले असून खोरनिनकोमध्ये वसंत कसबले यांचा गोठा कोसळून मोठे नुकसान झाले. तसेच विलावडे या ठिकानी घरामध्ये पाणी शिरले. देवधे येथे वाडा कोसळला असून बेनी बुद्रुक येथे राजेंद्र सुर्वे यांच्या घरावर झाड कोसळले आहे. विवली येथे गोठ्यावर झाड कोसळले आहे. एकूण परस्थिती पाहता तालुक्याचे मोठ्या प्रमाणात या नुकसान झाले आहे.

    काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी येथे ५ तास वाहतूक बंद करण्यात आली होती तर विलवडे येथे वाटुळ दाभोळे राज्य मार्गावर पुलावरून पाणी जात असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. हर्दखळे येथे मुख्य मार्गावर दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला होता.

    बुधवारी रात्री ढगफुटीसारख्या कोसळणाऱ्या पावसाने लांजा तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण केली आहे. अनेक ठिकाणी नदीचे पाणी शेतामध्ये शिरल्याने भात शेतीचे फार मोठे नुकसान झाले आहे. अनेक रस्त्यांवर झाडे उन्मळून पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अजूनही पावसाचा जोर सुरू असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीकाठी असलेल्या घरातील लोक जीव मुठीत घेऊन पाऊस कमी होण्यासाठी प्रार्थना करीत आहेत.