रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम, हवामान विभागाने दिलाय रेड अलर्ट

रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर(Red Alert In Ratnagiri) करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २२ जुलैपर्यंत रेड अलर्ट असून त्यानंतर  २४ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जाहीर केला आहे.

  रत्नागिरी : येत्या पाच दिवसांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात(Ratnagiri District) पावसाचा जोर(Heavy Rainfall In Ratnagiri) कायम राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर(Red Alert In Ratnagiri) करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २२ जुलैपर्यंत रेड अलर्ट असून त्यानंतर  २४ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जाहीर केला आहे.

  या काळात समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या जनतेला सतर्कता आणि सावधनतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात २४ तासात सरासरी १०२.७२ मिमी तर एकूण ९२४.६० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

  जिल्हा नियंत्रण कक्षाकडून २० जुलै रोजी सकाळी प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची प्राथमिक माहिती पुढीलप्रमाणे आहे.

  कुठे आणि काय झाले नुकसान ?

  • दापोली तालुक्यात मौजे हर्णे येथील विक्रांत  मयेकर यांच्या गाडी पार्कींगमध्ये पाणी शिरल्याने गाडीचे १ लाख २०हजाराचे नुकसान
  • मौजे बुरोंडी येथील हाजिरा ईस्माईल बुरोडकर यांच्या घराचे अंशत: १५ हजार रुपयांचे नुकसान. कोणतीही जिवीतहानी नाही.
  • मौजे ओननवसे -गुडघे-उंबरघर रस्ता खचला आहे. वाहतूक सध्या तरी सुरु आहे.
  • खेड तालुक्यात मौजे खेड येथील खेड-दापोली रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने सकाळी वाहतूक सुरळीत झाली आहे.

  जिल्ह्यात गेल्या २४ तासात पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी – मंडणगड – १०६.१० मिमी, दापोली -१६९.७० मिमी, खेड -१४०.३०, गुहागर – १३२.४० मिमी, चिपळूण – १२८.०० मिमी, संगमेश्वर – ६९.३० मिमी, रत्नागिरी – ६६.९० मिमी, राजापूर – ५९.४० मिमी,लांजा – ५२.४० मिमी