Heavy rainfall over Konkan floods in Chiplun ST buses sank in flood waters nrms | कोकणावर अतिवृष्टीची वक्रदृष्टी, चिपळूणमध्ये महापूर ; एसटी बसेस पुराच्या पाण्यात बुडाल्या | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
रत्नागिरी
Published: Jul 22, 2021 04:37 PM

आभाळ कोसळलं...कोकणावर अतिवृष्टीची वक्रदृष्टी, चिपळूणमध्ये महापूर ; एसटी बसेस पुराच्या पाण्यात बुडाल्या

Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
कोकणावर अतिवृष्टीची वक्रदृष्टी, चिपळूणमध्ये महापूर ; एसटी बसेस पुराच्या पाण्यात बुडाल्या

संपूर्ण मार्केट परिसर पाण्याखाली गेलं असून बाजारपेठेत आणि दुकानांत पाणी शिरलं आहे. त्याचप्रमाणे पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे येथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. तसेच येथील काही भागांत कमरेपेक्षा जास्त पाणी साचलं आहे. चिपळूण आणि कराड हा महामार्ग ठप्प असून वाहतूक विस्कळीत झालं आहे. 

  चिपळूण – राज्यात गेल्या चार दिवसांपासून कोसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक भागांत जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूण सुरू असणाऱ्या सतंतधार पावसामुळे संपूर्ण चिपळूण शहर जलमय झालं आहे. तसेच बाहेर उभ्या असलेल्या गाड्या देखील वाहून गेल्या आहेत. मात्र, चिपळून एसटी स्टँडवरील बसेस पुराच्या पाण्यात बुडाल्या आहेत.

  संपूर्ण मार्केट परिसर पाण्याखाली गेलं असून बाजारपेठेत आणि दुकानांत पाणी शिरलं आहे. त्याचप्रमाणे पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे येथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. तसेच येथील काही भागांत कमरेपेक्षा जास्त पाणी साचलं आहे. चिपळूण आणि कराड हा महामार्ग ठप्प असून वाहतूक विस्कळीत झालं आहे.

  रत्नागिरी विभागातील चिपळूण (ratnagiri) आणि कामथे स्थानकांदरम्यान १३० किमीवरील वशिष्ठी नदी पुलाची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा वर गेली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या विभागातील रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित केल्या आहेत.

  प्रचंड पावसामुळे चिपळूणमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ऍड. अनिलजी परब चिपळूणला पोहचले आहेत. पालकमंत्री अनिल परब यांनी रत्नागिरीत अधिकाऱ्यांबरोबर परिस्थितीचा आढावा घेतला. त्याशिवाय त्यांनी प्रत्यक्षात पाहणी केली.

   

  Comments
  Advertisement
  Advertisement
  दिनदर्शिका
  २५ रविवार
  रविवार, जुलै २५, २०२१

  एखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का?

  View Results

  Loading ... Loading ...
  Advertisement
  Advertisement
  OK

  We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.