मंडणगडमध्ये संततधार पावसामुळे दोन घरांचे नुकसान, तिडे मार्गावरील वाहतूक बंद

पावसामुळे(Rain In Mandangad) मंडणगड तालुक्यात दोन घरांचे(Two Houses Damaged) सुमारे २१ हजार रूपयांचे अंशतः नुकसान झाले आहे. तर तिडे, तळेघर, लाटवण परिसरातील वाहतूक रविवार व सोमवारी काही कालावधीकरीता बंद ठेवण्यात आली होती.

    मंडणगड : शनिवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे(Rain In Mandangad) मंडणगड तालुक्यात दोन घरांचे(Two Houses Damaged) सुमारे २१ हजार रूपयांचे अंशतः नुकसान झाले आहे. तर तिडे, तळेघर, लाटवण परिसरातील वाहतूक रविवार व सोमवारी काही कालावधीकरीता बंद ठेवण्यात आली होती.

    शनिवारपासून सुरू झालेला पाऊस रविवार व सोमवारीही सतत कोसळत असल्यामुळे टावली येथील पांडुरंग रक्ते यांच्या घराच्या छपराची पडझड होऊन ११४५० रूपयांचे नुकसान झाले आहे.तसेच अडखळ येथील संतोष कावणकर यांच्या पडवीची पडझड झाल्याने ९६०० रूपयांचे नुसान झाले आहे. सोमवारी तिडे तळेघर रस्त्यावर पाणी आल्याने तसेच टाकेडे मार्गावर व दाभट फरशीवरून पाणी गेल्याने विन्हे लाटवण रस्ता बंद ठेवण्यात आला होता.

    रविवारी मंडणगड तालुक्यात नोंदवण्यात आलेल्या पावसाचा तपशील पुढीलप्रमाणे – मंडणगड १४२ मि.मी., म्हाप्रळ १४५ मि.मी., देव्हारे १४२ मि.मी, वेसवी १५७ मि.मी., एकूण पाऊस ५५६, सरासरी पाऊस १४६ मि.मी. एकूण पाऊस २३५०