Heavy rains raised the level of Panderi dam; Warning to the citizens of Mandangad

धरणाचे खाली पणदेरी रोहीदास वाडी, बौध्दवाडी, बहीरवली व पणदेरी गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या ओढ्याला पाणी वाढले. त्याचा प्रवाह सखल भागाकडे वळवल्याने परिसर पाण्याने तुंबून गेला आहे. तसेच गावाकडे जाणारा मुख्य, आदीवासीवाडीकडे जाणारा पुलावरून पाणी गेले. त्यामुळे वाडीवाडीला जोडणाऱ्या पायवाटा, पाण्याखाल्या गेल्या. त्यामुळे परिसरातील नागरीकांमध्ये काही काळासाठी भितीचे वातावरण निर्माण झाले. पण धरणात पुन्हा पाणीसाठा मोठ्या प्रमाणात झाला असला तरी धरणास कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा लघु पाटबंधारे उपअभियंता गोविंद श्रीमंगले यांनी दिला आहे.

    मंडणगड : गेल्या आठवड्यात लागलेल्या गळतीनंतर पाटबंधारे विभागाने विविध उपाययोजना करित पणदेरी धरणाची मुख्य भिंत सुरक्षित केली आहे. तरी गेल्या दोन दिवसात तालुक्यात सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे धरणाचे जलशायाचे पातळीत प्रचंड प्रमाणात पाणी जमा होत आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढली आहे. सांडवा व कालव्याचे वाटेने पाण्याचे विसर्गही वाढला आहे. पण पाणी वाढल्याने धरणाखालील भागातील रहिवाशांची चिंता वाढली आहे.

    धरणाचे खाली पणदेरी रोहीदास वाडी, बौध्दवाडी, बहीरवली व पणदेरी गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या ओढ्याला पाणी वाढले. त्याचा प्रवाह सखल भागाकडे वळवल्याने परिसर पाण्याने तुंबून गेला आहे. तसेच गावाकडे जाणारा मुख्य, आदीवासीवाडीकडे जाणारा पुलावरून पाणी गेले. त्यामुळे वाडीवाडीला जोडणाऱ्या पायवाटा, पाण्याखाल्या गेल्या. त्यामुळे परिसरातील नागरीकांमध्ये काही काळासाठी भितीचे वातावरण निर्माण झाले. पण धरणात पुन्हा पाणीसाठा मोठ्या प्रमाणात झाला असला तरी धरणास कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा लघु पाटबंधारे उपअभियंता गोविंद श्रीमंगले यांनी दिला आहे.

    पणदेरी धरण परिसरात 12 जुलै 2021 रोजी 204 मिलीमीटर 13 जुलै 2021 रोजी 274 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यंदाचे हंगामात पणदेरी परिसरात 2074 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर पाणी पातळी 117.70 मीटर इतक्या उंचीवर पुन्हा पोहचली आहे. पणदेरी धऱणात निवळी नदीसह व पाले पाचरळ घोसाळे येथील सर्वच लहान मोठ्या ओढ्यातील पाणी जमा होत असल्याने पाणी पातळी वेगाने वाढली आहे.