प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

शिवसैनिकांप्रमाणे राजापूर तालुक्यातील संपूर्ण गोवळ ग्रामपंचायतीने अधिकृतपणे भाजपामध्ये प्रवेश केला. सरपंच आणि उपसरपंचासह गोवळमधील ग्रामपंचायतीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जवळपास दीड वर्षांपूर्वी जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांनी रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केले होते. त्यामुळे त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली होती.

    रत्नागिरी: रत्नागिरीतील नाणार रिफायनरीच्या मुद्यावरून शिवसेनेला बालेकिल्ल्यातच आणखी एक धक्का मिळाला आहे. नाणार रिफायनरीच्या समर्थनार्थ शिवसैनिकांचे ‘सोडसत्र’ सुरूच आहे. सेनेच्या माजी शाखाप्रमुखासह 100 शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेनेच्या सागवे विभागातील जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांनी सोमवारी शिवसेनेला जयमहाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याशिवाय शिवसेनेच्या चार माजी शाखा प्रमुखांसह नाणार पंचक्रोशीतील 100 हून अधिक शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपात दाखल झाले.

    शिवसैनिकांप्रमाणे राजापूर तालुक्यातील संपूर्ण गोवळ ग्रामपंचायतीने अधिकृतपणे भाजपामध्ये प्रवेश केला. सरपंच आणि उपसरपंचासह गोवळमधील ग्रामपंचायतीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जवळपास दीड वर्षांपूर्वी जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांनी रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केले होते. त्यामुळे त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली होती.

    मात्र, तब्बल दीड वर्षानंतर रिफायनरीला विरोध करणाऱ्या शिवसेनेची भूमिका बदलत नाही हे पाहून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सिंधुदूर्ग आणि रत्नागिरीचे भाजपचे जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा झाला.